संशोधनाला मिळणार ‘डिजिटल’ गती

By admin | Published: March 14, 2017 07:57 AM2017-03-14T07:57:55+5:302017-03-14T07:57:55+5:30

संशोधन प्रक्रियेत गती आणि अचूकता आणण्यासाठी पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च (आयसर) या संस्थेत सुपर कॉम्प्युटर बसविला जाणार आहे.

'Digital' speed will be available for research | संशोधनाला मिळणार ‘डिजिटल’ गती

संशोधनाला मिळणार ‘डिजिटल’ गती

Next

पुणे : संशोधन प्रक्रियेत गती आणि अचूकता आणण्यासाठी पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च (आयसर) या संस्थेत सुपर कॉम्प्युटर बसविला जाणार आहे. नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग मिशनअंतर्गत देशात ७२ संस्थांमध्ये अशा प्रकारे सुपर कॉम्प्युटर बसविला जाणार असून, त्यातील पहिला कॉम्प्युटर ‘आयसर’ला मिळणार आहे. त्यामुळे पुणे व परिसरातील संशोधकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.
केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विभागामार्फत देशात दोन वर्षांपूर्वी नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशनची सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये पुण्यात प्रगत संगणक विकास केंद्र (सी-डॅक)ची भूमिका महत्त्वाची असणार आहे.
शैक्षणिक, संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रामध्ये सुपर कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून समन्वय साधणे, त्यांना एकत्रित आणणे, प्रगत संगणक क्षमता निर्माण करण्यासाठी हे मिशन महत्त्वपूर्ण आहे. याअंतर्गत देशात ठिकठिकाणी ७२ सुपर कॉम्प्युटर बसविले जाणार आहेत. त्याची क्षमता वेगवेगळी असणार आहे. हे सर्व संगणक एकमेकांशी संलग्न केले जाणार असल्याने शैक्षणिक व संशोधनासाठी भविष्यात मोठी संधी निर्माण होणार आहे. या साखळीतील पहिला सुपर कॉम्प्युटर पुण्यातील ‘आयसर’ या संस्थेत बसविला जाणार आहे. या संगणकाची क्षमता ५०० टेराफ्लॉप्स एवढी असून येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत संस्थेत बसविण्याचे उद्दिष्ट आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ‘आयसर’चे समन्वयक प्रा. अरविंद नातू म्हणाले, ‘‘सुपर कॉम्प्युटरसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा सध्या आयसरमध्ये उपलब्ध आहेत. शास्त्रज्ञांची टीमही सज्ज आहे. त्यामुळे या संस्थेची निवड करण्यात आली आहे. त्यानंतर वाराणसी आणि खरगपूर येथील आयआयटीमध्ये हे संगणक बसविले जातील. त्याची क्षमता आणखी जास्त असणार आहे.’’ (प्रतिनिधी)

Web Title: 'Digital' speed will be available for research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.