डिजीधन-निजीधन गरिबांचा आवाज होणार - पंतप्रधान मोदी

By Admin | Published: April 14, 2017 03:43 PM2017-04-14T15:43:10+5:302017-04-14T15:43:10+5:30

भ्रष्टाचार दूर होऊन डिजीधन हे देशातल्या प्रत्येक गरिबाला निजीधन वाटेल, व ही योजना गरिबाचा आवाज बनेल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीधन मेळाव्यात व्यक्त केला.

Digitization-personalization will be poor voice - Prime Minister Modi | डिजीधन-निजीधन गरिबांचा आवाज होणार - पंतप्रधान मोदी

डिजीधन-निजीधन गरिबांचा आवाज होणार - पंतप्रधान मोदी

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 -  डिजीधनचा जो मंत्र भारत सरकारने देशाला दिला आहे. त्याव्दारे अर्थव्यवस्थेत बोकाळलेला भ्रष्टाचार दूर होऊन डिजीधन हे देशातल्या प्रत्येक गरिबाला निजीधन वाटेल, व ही योजना गरिबाचा आवाज बनेल, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजीधन मेळाव्यात व्यक्त केला. 
 
नागपुरातील मानकारपूर येथील विभागीय क्रीडा संकुलात शुक्रवारी आयोजित ‘भीम आधार अ‍ॅप’ च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, केंद्रीय उर्जामंत्री पियुष गोयल, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार व खासदार कृपाल तुमाने उपस्थित होते. 
 
पंतप्रधान पुढे म्हणाले,  डॉ. बाबासाहेबांच्या जन्मदिनी मला दीक्षाभूमीचे दर्शन घेण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो. बाबासाहेबांच्या कल्पनेतील आर्थिक क्रांती साकारण्यासाठी आम्ही
 
"डीजीधन  या योजनेव्दारे भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याचे आमचे स्वप्न आहे. मोबाइलच प्रत्येकांची बँक बनावे आणि आपल्या हाताचा अंगठा हा त्या बँकेची चावी बनावी.  असे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाची अपेक्षा आहे. त्या दिशेने आमचा प्रवास सुरू  झाला आहे. त्याचा शुभारंभ बाबासाहेबांनी ज्या भूमीवर बौद्घधम्माची दीक्षा घेतली, त्या नागपुरातून होतेय हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, अशी भावना यावेळी पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली. 
 
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्राने आणलेल्या ‘भीम अ‍ॅप’च्या या योजनेच्या शुभारंभालाच महाराष्ट्र शासनाने राज्यातील शंभर गावांत याची अंमलबजावणी सुरू केली आहे. केंद्राच्या प्रत्येक नवनवीन योजनेला कृती उतरवण्यासाठी महाराष्ट्र सदैव केंद्राच्या पाउलावर पाउल ठेवून पुढे चालेल, याची मी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून खात्री देतो, असेही ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील मुद्दे
-पंतप्रधान आवास योजनेच्या 21 शहरातील कामाला नागपूर येथून सुरुवात झाली आहे. 2019 पर्यंत राज्यातील सर्व गरिबांना घरे देणार 
-भीम अॅपमुळे देशात पारदर्शक व्यवहार होतील,राज्यांनी या योजना शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत,2018 पर्यंत राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतीत या योजनेला पोहोचवणार.15 हजार ग्रामपंचायत डिजिटल करणार  
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक चिंतनावर आधारित स्वप्न पंतप्रधान मोदीजी साकारत आहेत
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणातील मुद्दे
- नागपूर जिल्हा देशातील डिजिटल जिल्हा ठरला आहे, ही बाब गौरवाची. नागपूर एज्युकेशन हब होत आहे 
- देश आर्थिक महासतेकडे वाटचाल करत आहे, सर्व ठिकाणी पारदर्शकता येत आहे, ही चांगली सुरुवात आहे
- गरिबांचा विकास होण्याचा उद्देश समोर ठेऊनच डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू झाली आहे, या माध्यमातून गैरप्रकार रोखले जातील 
- विजेवर टॅक्सी चालणारे नागपूर हे देशातील पहिले शहर लवकरच ठरणार आहे
 
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या भाषणातील मुद्दे
- आम्ही देशाला डिजिटल करतो आहे, गरिबांपर्यंत खऱ्या अर्थाने योजना पोहोचत आहेत. हे या सरकारचे यश आहे. 
- नागपूरला आयटीचे केंद्र बनवायचं आहे. त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. 
- मोबाइल क्षेत्रात क्रांती होत आहे, 72 नवीन कंपन्या आल्या. 12 कोटी नवीन मोबाइलचे उत्पादन झाले 
- डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारत आहे. दिल्लीतून निघालेला एक रुपयादेखील गरिबांपर्यंत पोहोचला पाहिजे हे आमचे धोरण आहे 
 

Web Title: Digitization-personalization will be poor voice - Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.