वळसे-पाटील यांची प्रकृती स्थिर

By admin | Published: December 17, 2015 12:53 AM2015-12-17T00:53:03+5:302015-12-17T00:53:03+5:30

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना शुक्रवारी घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय

Dilasa-Patil's condition is stable | वळसे-पाटील यांची प्रकृती स्थिर

वळसे-पाटील यांची प्रकृती स्थिर

Next

पुणे : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना शुक्रवारी घरी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिली.
तीन दिवसांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात वळसे-पाटील यांना त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या हृदयाची गती नियमित नसल्याचे जाणवल्याने, त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू केले. वळसे-पाटील यांच्या तब्येतीत सुधारणा असल्याने चिंतेचे कारण नाही. सोशल मीडियामधून फिरणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवून अफवा पसरवू नयेत, असे आवाहनही डॉ. ग्रँट यांनी पत्रकार परिषदेत केले.
या वेळी वळसे-पाटील यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अल्पशा विश्रांतीनंतर माझे नियमित काम सुरू होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Dilasa-Patil's condition is stable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.