‘१५ दिवसांत तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना’ ,सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेंचं आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 03:42 AM2018-01-24T03:42:41+5:302018-01-24T03:42:58+5:30
तृतीयपंथी समाजाच्या कल्याणासाठी येत्या १५ दिवसांत तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी दिले.
मुंबई : तृतीयपंथी समाजाच्या कल्याणासाठी येत्या १५ दिवसांत तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना करण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंगळवारी दिले. तृतीयपंथींच्या कल्याणासाठी मंडळ स्थापन करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
येत्या १५ दिवसांत तृतीयपंथींच्या कल्याणासाठी मंडळाची रचना पूर्ण होईल. सुरुवातीला या मंडळासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात येईल. मंडळासाठी केंद्राचा निधी उपलब्ध होईल, असे कांबळे म्हणाले. बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी आणि तृतीयपंथींचे प्रतिनिधी लक्ष्मी नारायण त्रिपाठी, पवित्रा निंभोरकर आदी उपस्थित होते. मंडळाच्या घोषणेमुळे या समाजाच्या संविधानिक व मानवी हक्काचे संरक्षण होईल, असे लक्ष्मी त्रिपाठी यांनी सांगितले.