दिलीप वळसे-पाटलांना हृदयविकाराचा झटका नाही, डॉक्टरांचा खुलासा
By admin | Published: December 13, 2015 08:52 PM2015-12-13T20:52:46+5:302015-12-13T20:52:46+5:30
दिलीप वळसे-पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला नसून पेसमेकरमध्ये बिघाड झाल्याने वळसे-पाटलांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती पुण्यातील रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १३ - दिलीप वळसे-पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला नसून पेसमेकरमध्ये बिघाड झाल्याने वळसे-पाटलांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती पुण्यातील रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याचे मुख्य ह्रदयरोग तज्ञ परवेझ यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवा निमित्त पुणे येथे कात्रज दूध संघामध्ये रविवारी कार्यक्रम सुरु असताना ही घटना घडली. कार्यक्रमात शरद पवार यांच्या आठवणी सांगत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. उपस्थितांनी त्यांना लगेचच जवळच्या भारती विद्यापीठाच्या रुग्णालयात नेले. या कार्यक्रमात त्यांच्यासोबत अजित पवारही उपस्थित होते. दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्षपदही भूषवले आहे.