भोंगे उतरवण्याचा भाजपचा अजेंडा; राज्यातील कायदा सुव्यवस्था नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 06:25 PM2022-04-05T18:25:31+5:302022-04-05T18:25:54+5:30

"हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अशाप्रकारची आंदोलने करुन जनतेमध्ये अस्वस्थतेची भावना तयार केली जात आहे;" दिलीप वळसे पाटील यांचं वक्तव्य.

dilip walse patil chairs law and order meeting maharashtra commented loud speakers bjp agenda in all states | भोंगे उतरवण्याचा भाजपचा अजेंडा; राज्यातील कायदा सुव्यवस्था नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

भोंगे उतरवण्याचा भाजपचा अजेंडा; राज्यातील कायदा सुव्यवस्था नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

Next

"भोंगे उतरवण्याचा भाजपचा अजेंडा आहे. भोंगे उतरण्यावण्याबाबत भलेही त्यांनी महाराष्ट्रात हे सुरू केलं असेल, पण कर्नाटकातही आणि अन्य राज्यामध्येही अशा प्रकारचं आंदोलन सुरू आहे. हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अशाप्रकारची आंदोलने करुन जनतेमध्ये अस्वस्थतेची भावना तयार केली जात आहे," असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. मंगळवारी राज्यातील कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

"पोलिस यंत्रणा संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडतील असं वाटत नाही," असं वळसे पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. भविष्यात कायदा व सुव्यवस्था असाच ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगतानाच यासाठी जनतेने सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

राऊत यांच्या नोटीसीवरही भाष्य
संजय राऊत यांना कोणतीही नोटीस न देता किंवा चौकशी न करता कारवाई ईडी करत असेल तर केंद्र सरकारचा कारभार कशाप्रकारे सुरू आहे हे लक्षात येत आहे. मात्र यामुळे सरकारला कोणताही धोका नाही. सरकार पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल. चांगल्या पद्धतीनं लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करू असा विश्वासही दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

Web Title: dilip walse patil chairs law and order meeting maharashtra commented loud speakers bjp agenda in all states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.