Dilip Walse Patil: किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास 'शूट अ‍ॅट साईट'ची ऑर्डर? गृहमंत्री म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 02:31 PM2022-04-26T14:31:43+5:302022-04-26T14:32:18+5:30

Dilip Walse Patil: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्याची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून(CISF) गंभीर दखल घेण्यात आली आहे.

Dilip Walse Patil | Kirit Somaiya | CISF give shoot at site order if anyone attack's Kirit Somaiya, Dilip Walse Patil says... | Dilip Walse Patil: किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास 'शूट अ‍ॅट साईट'ची ऑर्डर? गृहमंत्री म्हणतात...

Dilip Walse Patil: किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास 'शूट अ‍ॅट साईट'ची ऑर्डर? गृहमंत्री म्हणतात...

googlenewsNext

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiyya) यांच्या गाडीवर खार पोलीस स्टेशनबाहेर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्याची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (CISF) गंभीर दखल घेण्यात आली असून, झेड दर्जाची सुरक्षा असलेल्या सोमय्यांवर यापूढे हल्ला झाल्यास 'शूट अ‍ॅट साईट'चे आदेश देऊ, असा कठोर पवित्रा CISF ने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याबाबत आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

आज दिलीप वळसे पाटलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. CISFने मुंबई पोलिसांना खरोखरच असे सांगितले आहे का, असा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, "CISF ने असा काही आदेश दिला असेल,मला असे वाटत नाही की. असा आदेश देण्याची परवानगी कोणालाच नसते. त्यांचे काम संरक्षण करण्याचे आहे. महाराष्ट्र पोलीस किंवा CISF अशा पद्धतीचा निर्णय घेत नाहीत. तरीही या माहितीची मी खातरजमा करेन," असं वळसे-पाटील म्हणाले.

नवनीत राणांना कोठडीत वाईट वागणूक?
खासदार नवनीत राणा यांनी पोलीस कोठडीत त्यांच्यासोबत हीन वागणूक झाल्याचा आरोप केल्याप्रकरणी दिलीप वळसे पाटील यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. "नवनीत राणा यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात मी स्वत: चौकशी केली आणि तसं काही घडलेल नाही. त्यांच्यासोबत कोणतीही हीन वागणूक देण्याचा प्रकार घडलेला नाही. राणा दाम्पत्यावर आतापर्यंत झालेली कारवाई पूर्णपणे कायदेशीर आहे. याबाबत मी अधिक बोलणार नाही. कारण त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली आहे आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत तथ्यावर आधारित माहिती आमच्याकडे मागितली आहे. ती माहिती लवरकच पाठवण्यात येईल", असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. 
 

संबंधित बातमी- Z सुरक्षा असलेल्या किरीट सोमैयांवर दोनदा हल्ले, CISFने आपल्या जवानांना दिले खास आदेश

Web Title: Dilip Walse Patil | Kirit Somaiya | CISF give shoot at site order if anyone attack's Kirit Somaiya, Dilip Walse Patil says...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.