मुंबईतील डबेवाल्यांची मतदान दिंडी
By Admin | Published: February 17, 2017 07:50 PM2017-02-17T19:50:16+5:302017-02-17T19:50:16+5:30
मुंबईमध्ये मतांची टक्केवारी वाढावी व मतदारांमध्ये जागरूकता यावी, यासाठी मुंबई महानगर पालिका विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नांना मदत म्हणून मुंबईचे डबेवाले
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - मुंबईमध्ये मतांची टक्केवारी वाढावी व मतदारांमध्ये जागरूकता यावी, यासाठी मुंबई महानगर पालिका विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नांना मदत म्हणून मुंबईचे डबेवाले 'मतदान दिंडी' काढणार आहेत.
मुंबईत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून या दिंडीच्या माध्यमातून डबेवाले मुंबईकरांना मतदान करा, असे आवाहन करणार आहे. जितका समाज सुशिक्षित तितका तो मतदान करण्याबाबत उदासीन दिसतो.
मुंबई शहरात मतदानाचा टक्का घसरतो. तो मतदानाचा टक्का वाढला पाहीजे, म्हणून ही दिंडी डबेवाले संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे, उल्हास मुके, सोपान मरे, बबन वाळंज यांच्या नेतृत्वाखाली काढणार आहोत.