दिशा समितीची कार्यकारिणी जाहीर
By admin | Published: April 5, 2017 01:28 AM2017-04-05T01:28:07+5:302017-04-05T01:28:07+5:30
पुणे जिल्हाध्यक्षपदी लोकसभेचे ज्येष्ठ खासदार शिवाजीराव आढळराव आणि सह अध्यक्षपदी खासदार अमर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पिंपरी : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण (दिशा) समितीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी लोकसभेचे ज्येष्ठ खासदार शिवाजीराव आढळराव आणि सह अध्यक्षपदी खासदार अमर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिशा समितीअंतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय सामाजिक साहाय्य कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, भूमी अभिलेख संगणकीकरण, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी रूरबन मिशन, नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट आॅग्युमेंटेशन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, मध्यान्ह भोजन योजना, एकात्मिक बाल विकास योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामीण प्रधानमंत्री आवास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना आणि भारत संचार निगम लिमिटेड या विविध योजनांचा आढावा घेऊन या योजनांची अंमलबजावणी केली जाते. या समितीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी लोकसभेचे ज्येष्ठ खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची, तर सह अध्यक्षपदी खासदार अमर साबळे यांची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)