५४ लाख नोंदींच्या आधारे मराठा कुणबी प्रमाणपत्र तातडीने सुपूर्द करा, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 06:14 AM2024-01-19T06:14:30+5:302024-01-19T06:14:51+5:30
अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. देवरा यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई : राज्यात ५४ लाख नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र तत्काळ देण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन करून तातडीने जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी दिले. नोंदींच्या याद्या तलाठ्यांमार्फत प्रसिद्ध कराव्यात. जेणेकरून पात्र नागरिकांना त्या पुरावा म्हणून सादर करता येतील, असे त्यांनी सांगितले.
२३ पासून मराठा समाजाचे सर्वेक्षण
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी २३ जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मागासवर्ग आयोगाने दिली आहे. आहे. सर्वेक्षणासाठी सॉफ्टवेअर तयार केले असून सर्वेक्षण ३१ जानेवारी २०२४ पूर्वी पूर्ण होईल.