क्लासेसचे संचालक संशयाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2017 04:54 AM2017-02-28T04:54:11+5:302017-02-28T04:54:11+5:30

पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सैन्य भरती घोटाळ्याने स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणारे संचालक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

The director of the classes is in doubt | क्लासेसचे संचालक संशयाच्या भोवऱ्यात

क्लासेसचे संचालक संशयाच्या भोवऱ्यात

Next

राजू ओढे,
ठाणे-  पोलिसांनी उघडकीस आणलेल्या सैन्य भरती घोटाळ्याने स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेणारे संचालक संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. परीक्षार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवण्यात या क्लासेसचे संचालकही मुख्य भूमिकेत असल्याचे चित्र दिसत आहे.
सैन्य भरती मंडळातर्फे २६ फेब्रुवारी रोजी लिपिक आणि ट्रेड्समनसह ४ पदांसाठी देशभरात घेतलेल्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी अटक केलेल्या २१ आरोपींमध्ये सैन्य दलाच्या ४ आजीमाजी कर्मचाऱ्यांसह स्पर्धा परीक्षेची शिकवणी घेणाऱ्या क्लासेसच्या संचालकाचाही समावेश आहे. या टोळीची काम करण्याची पद्धत अतिशय सूत्रबद्ध आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी किमान २/४ वर्षे संचालकांच्या संपर्कात असतात. त्यापैकी बौद्धिक क्षमता तुलनात्मकदृष्ट्या कमी आणि खर्च करण्याची क्षमता जास्त असलेले विद्यार्थी हे संचालक हेरतात.
या घोटाळ्यातून या टोळीची एकूणच कार्यपद्धती स्पष्ट झाली आहे. प्रश्नपत्रिका परीक्षेच्या एक दिवस आधी हाती लागल्यानंतर टोळीच्या प्रमुखांनी ती नागपूर, पुणे आणि गोवा येथील त्यांच्या हस्तकांपर्यंत पोहोचवली. तत्पूर्वी इच्छुक परीक्षार्थ्यांसोबत खर्चाबाबत बोलणी झालेली होतीच. इच्छुक परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या जवळपास मोठी निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणी एक दिवस आधी एकत्र करण्यात आले होते. खबरदारी म्हणून सर्व परीक्षार्थ्यांनाचे मोबाइल फोन आणि त्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती टोळीतील सदस्यांनी स्वत:च्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर, सर्व परीक्षार्थ्यांनाना वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नपत्रिकेच्या प्रती (उत्तरासह) देण्यात आल्या. परीक्षार्थ्यांनी त्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्यांची झोपण्याची व्यवस्था तिथेच करण्यात आली. येथून बाहेर पडण्याची परवानगी परीक्षार्थ्यांना देण्यात आली नव्हती. परीक्षा केंद्रांवर जाण्यास किती वेळ लागतो, याचा अंदाज घेऊन परीक्षार्थ्यांना सोडण्यात आले. परीक्षार्थ्यांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती त्याची अंतिम निवड होईपर्यंत त्याला परत दिल्या जात नाहीत. आरोपींकडून एवढी खबरदारी घेतली जात असल्याने वर्षानुवर्षे हा घोटाळा बिनदिक्कतपणे सुरू होता, अशी माहिती तपासातून समोर येऊ लागली आहे.

Web Title: The director of the classes is in doubt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.