आमिर खानच्या घरासमोर कडेकोट सुरक्षा
By admin | Published: November 24, 2015 05:59 PM2015-11-24T17:59:02+5:302015-11-24T17:59:28+5:30
अभिनेता आमिर खानने देश सोडून जाण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी जोरदार टीका केली आहे. तसेच, अमिर खानच्या घरासमोर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - अभिनेता आमिर खानने देश सोडून जाण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर अनेकांनी जोरदार टीका केली आहे. तसेच, अमिर खानच्या घरासमोर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमिरच्या घरासमोर सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
आम्ही आमिर खानच्या घरोसमोर पुरेसा पोलीस बंदोबस्त केला आहे. मुंबईत किंवा आमिरच्या घराजवळ कोणत्याही प्रकारची निदर्शने होऊ नयेत याची काळजी घेण्यात आली असून अमिरच्या घरासमोर घोषणाबाजी करणा-या पाच हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलीसांनी सांगितले.
सोमवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात आमिरने देशातील वाढत्या असहिष्णूतेविरोधात वक्तव्य केले. यावेळी त्याने
या घटनांच्या विरोधात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीचेही त्याने समर्थन केले. आपली निराशा व्यक्त करण्यासाठी प्रतिभावंत मंडळींसाठी पुरस्कारवापसी हा एक मार्ग असू शकतो, अशा शब्दांत आमिरने त्यांना पाठिंबा दर्शवला.
' या देशात काय घडतयं ते आम्ही रोज वृत्तपत्रातून वाचत असतो, पहात असतो. गेल्या काही महिन्यात देशात घडलेल्या घटनांबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत ते धक्कादायक आहेत. जे घडतयं, त्यामुळे मी चिंतित झालो, हे नाकबूल करणार नाही. विशेषत: गेल्या सहा ते आठ आठवड्यात देशातील असुरक्षितता, भय वाढले आहे' असे आमिर म्हणाला. 'आपण भारत सोडूया का असा प्रश्न किरणने धास्तीपोटी मला विचारला होता. सभोवतालच्या वातावरणामुळे ती चिंतातुर झाली, मुलांची तिला काळजी वाटते. रोज पेपर उघडतानाही ती घाबरलेली असते. किरणने मला असा प्रश्न विचारणे माझ्यासाठी धक्कादायक होते, पण भोवती असलेल्या अस्वस्थतेचे ते द्योतक असल्याचे आमिर म्हणाला.
यावेळी त्याने राजकारण्यांवरही निशाणा साधला. आपवी काळजी घेण्यासाठी आपण निवडून दिलेल्या लोकांनी, नेत्यांनी खंबीरपणे पावले उचलणे, कायदा हातात घेणा-याविरोधात कडक कारवाई करणे अपेक्षित असते. पण ते होत नसल्यामुळेच असुरक्षिततेची भावना वाढत चालली असल्याचे सांगत त्याने राजकारण्यांवर टीका केली.
दरम्यान, दुसरीकडे आमिरने केलेल्या या वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.