आधार नोंदणी बंदमुळे नागरिकांची गैरसोय
By admin | Published: July 15, 2017 02:53 AM2017-07-15T02:53:36+5:302017-07-15T02:53:36+5:30
मागील दीड महिन्यापासून तालुक्यात नवीन आधार नोंदणी, तसेच आधार कार्डातील दुरुस्तीची कामे बंद आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहा : मागील दीड महिन्यापासून तालुक्यात नवीन आधार नोंदणी, तसेच आधार कार्डातील दुरुस्तीची कामे बंद आहेत. या कामांसाठी आधार केंद्र व महा-ई-सेवा केंद्रात जाणाऱ्या नागरिकांना सिस्टीम बंद आहे हे उत्तर दिले जात आहे. केंद्र शासनाने सर्व योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे केले आहे; परंतु आधार नोंदणी बंदमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.
शासनाने आधार व पॅनकार्ड लिंकिंग सक्तीचे केले आहे. यामुळे आर्थिक गैरव्यवहारांना आळा बसणार आहे; परंतु अनेक नागरिकांच्या आधार व पॅनकार्डवरील नावांच्या स्पेलिंगमध्ये फरक असल्यामुळे आधार कार्ड पॅनकार्डशी संलग्न होत नसल्याने नागरिकांना आधार दुरुस्तीसाठी महा- ई- सेवा केंद्रात धाव घ्यावी लागत आहे; परंतु मागील दीड महिन्यांपासून आधार नोंदणीची सिस्टीम बंद आहे.