‘सीबीआयच्या तपासावर असमाधानी!’
By Admin | Published: December 14, 2014 01:49 AM2014-12-14T01:49:14+5:302014-12-14T01:49:14+5:30
तपासावर अंधश्रद्धा निमरूलन समितीचे (अंनिस) कार्यकर्ते व दाभोलकर कुटुंबीय अत्यंत असमाधानी असल्याची भावना अंनिसचे राज्य सरचिटणीस हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.
पुणो : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 16 महिने पूर्ण होत असताना त्याचा अद्याप छडा लागलेला नाही. तसेच याचा तपास करणा:या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाकडून कोणतीही माहिती दिली गेली नाही. त्यांच्या तपासावर अंधश्रद्धा निमरूलन समितीचे (अंनिस) कार्यकर्ते व दाभोलकर कुटुंबीय अत्यंत असमाधानी असल्याची भावना अंनिसचे राज्य सरचिटणीस हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.
जादूटोणाविरोधी कायद्याला एक वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त अंनिसतर्फे 13 ते 2क् डिसेंबरदरम्यान कायदा प्रबोधन सप्ताह साजरा केला जाणार आहे.
यानिमित्ताने पदाधिका:यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी हमीद दाभोलकर म्हणाले, ‘‘दाभोलकरांच्या खुनाचा तपास काटेकोरपणो झालेला नाही. ज्या धर्माध शक्तींवर खुनाचा संशय व्यक्त करण्यात आला होता, त्यांच्याकडे जितक्या सखोलपणो तपास व्हायला हवा होता, तितका तो झाला नाही. सीबीआयकडे तपास गेल्यापासून त्यांनी तपासामध्ये काय प्रगती केली त्याची काहीही माहिती अद्यापर्पयत दिलेली नाही.’’ (प्रतिनिधी)
जादूटोणाविरोधी हेल्पलाइन : जादूटोण्याचे प्रकार कुठे होत असल्याचे आढळल्यास त्याविरुद्ध काय करावे याबाबत कोणाला काही मार्गदर्शन हवे असल्यास मदत करण्यासाठी अंनिसने हेल्पलाइन सुरू केली आहे. 75888क्6688 हा हेल्पलाइनचा क्रमांक आहे.
प्लँचेटचा अहवाल सरकार का दडवितेय? : पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दाभोलकर यांच्या खुनाचा तपास करताना प्लँचेटचा अवलंब केल्याची धक्कादायक बाब उजेडात आल्यावर त्याची उच्चस्तरीय चौकशी शासनाकडून करण्यात आली आहे. तरीही हा अहवाल जाहीर करण्यास शासन टाळाटाळ का करते, असा प्रश्न अंनिसच्या पदाधिका:यांनी उपस्थित केला.