१ मेपासून कचरामुक्तीचे अभियान
By Admin | Published: March 31, 2017 01:34 AM2017-03-31T01:34:38+5:302017-03-31T01:34:38+5:30
राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांमधील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करून त्यापासून
मुंबई : राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या शहरांमधील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करून त्यापासून खताची निर्मिती केली जाईल आणि त्याची विक्रीही केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंड संदर्भात आमदार नरेंद्र पवार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. ओला कचरा निराळा गोळा केला तर त्याचे कंपोस्ट खत चांगले तयार होते. महापालिका व नगरपालिकांनी तयार केलेल्या कंपोस्ट खताची विक्र ी हरित महासिटी कंपोस्ट या नवीन ब्रॅण्डखाली केली जाईल. शहरे स्वच्छ होतील व शेतीसाठी उत्तम खत मिळेल. अनेक ठिकाणी आताच हरित महाकंपोस्ट तयार करण्यास व विक्री करण्यास सुरुवात झाल्याचेही ते म्हणाले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत कचऱ्यावरील प्रक्रियेचा प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनाने निम्मा निधी द्यावा, असा आग्रह आमदार नरेंद्र पवार यांनी धरला. त्यावर, अपवादात्मक बाब म्हणून ५० टक्के निधी दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.