शरद पवारांना डिस्चार्ज
By admin | Published: January 28, 2016 03:41 AM2016-01-28T03:41:36+5:302016-01-28T03:41:36+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आता ठणठणीत असून बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती आता ठणठणीत असून बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना दहा दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. रुग्णालयातून सोडल्यानंतर ते मुंबईला रवाना झाले.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे पवार यांना चार दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र, त्यांनी स्वत:च आपण ठणठणीत असल्याचे टिष्ट्वटरवरून स्पष्ट केले होते. रुग्णालयातून सोडल्यानंतर ते म्हणाले, ‘‘डॉक्टरांनी मला दहा दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र मला एखाददुसरा दिवसही बसून काढणे जमेल, असे वाटत नाही. पुढील दोन महिने तरी मला कामातून सुटी मिळणार नाही.’’(प्रतिनिधी)