निम्न तेरणा प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी विसर्ग सुरू; शेतकऱ्यांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 08:54 PM2021-08-15T20:54:45+5:302021-08-15T20:55:04+5:30

१५ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आला विसर्ग.

Discharge of water from the canal of the lower Terna project Farmers will get benefit | निम्न तेरणा प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी विसर्ग सुरू; शेतकऱ्यांना होणार फायदा

निम्न तेरणा प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी विसर्ग सुरू; शेतकऱ्यांना होणार फायदा

googlenewsNext
ठळक मुद्दे१५ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आला विसर्ग.

लोहारा : लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत रविवारी १५ ऑगस्ट रोजी पाणी विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यांचा लोहारा,उमरगा,औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

मागील एक महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्या लगत असलेल्या शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी लोहारा - उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मागच्याच आठवड्यात लातूर विभागाचे अधीक्षक अभियंता,उपकार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करून संपर्क साधला होता. या अनुषंगाने रविवारी १५ ऑगस्ट रोजी माकणी निम्न तेरणा  प्रकल्प येथे खासदार ओमराजे निंबाळकर,लोहारा - उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, औश्याचे आमदार अभिमन्यु पवार यांच्या उपस्थितीत उजव्या व डाव्या या दोन्ही कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

सध्या सदर प्रकल्पात एकूण ७९.५२५ दलघमी उपलब्ध पाणीसाठा असून यापैकी एकूण ओपन पॉईंट ३३ टक्के म्हणजेच ४९.५५८ दलघमी एवढा उपलब्ध पाणीसाठा आहे. सदर पाणीसाठा पैकी उजव्या कालव्याद्वारे ३.०४ घमी पर सेकंद व डाव्या कालव्याद्वारे ३.०४ घमी पर सेकंद इतका विसर्ग होत असून सदरचे पुढील पंधरा दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे उजव्या कालव्या लगतच्या लोहारा - उमरगा तालुक्यातील माकणी, सास्तूर, राजेगाव, पेठसांगवी,होळी ,कवठा यासह एकूण २३ गावातील शेतकऱ्यांना व डाव्या कालव्याला लगतच्या औसा तालुक्यातील सारणी मंगरूळ आदी २० गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

Web Title: Discharge of water from the canal of the lower Terna project Farmers will get benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.