कामाच्या वेळेत व्यसन केल्यास शिस्तभंग
By admin | Published: January 24, 2017 02:42 AM2017-01-24T02:42:22+5:302017-01-24T02:42:22+5:30
शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कामाच्या वेळेत पान, तंबाखू, सुपारीचे सेवन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा
पुणे : शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कामाच्या वेळेत पान, तंबाखू, सुपारीचे सेवन केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा फतवा गृहविभागाने काढला असून या सूचनेचे उल्लंघन केले जाऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शासकीय कर्मचारी, अधिकारी कार्यालयीन वेळेत पान, तंबाखू व सुपारीचे सेवन करतात. वरिष्ठ अधिकारी, मंत्री यांच्याशी चर्चा करताना ते पान, तंबाखू, सुपारी खाऊन जातात. अधिकारी, कर्मचारी यांचे हे वर्तन औचित्यास न शोभणारे असल्याने गृहविभागाने त्यावर निर्बंध घालण्याचे ठरविले आहे. पान, तंबाखू, सुपारी यांचे सेवन केल्याने कार्यालयाचा परिसर घाण होतो. या सवयी प्रकृतीच्या दृष्टीनेही घातक आहेत. काम करीत असताना या पदार्थांचे सेवन टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या असून या सूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.