अपंग कल्याण उपायुक्तांना शिस्तभंगाची नोटीस
By Admin | Published: October 31, 2016 04:17 AM2016-10-31T04:17:05+5:302016-10-31T04:17:05+5:30
माहिती अधिकार अपिलावरील सुनावणी न घेणाऱ्या तत्कालिन अपंगकल्याण उपायुक्त विजया पवार यांना शिस्तभंगाची कारवाई का प्रस्तावित का करू नये
पुणे : माहिती अधिकार अपिलावरील सुनावणी न घेणाऱ्या तत्कालिन अपंगकल्याण उपायुक्त विजया पवार यांना शिस्तभंगाची कारवाई का प्रस्तावित का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस राज्य माहिती आयोगाच्या पुणे खंडपीठाने पाठविली आहे. तसेच माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या माहिती अधिकाऱ्यास तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. एकाच प्रकरणात दोन अधिकाऱ्यांवर माहिती आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
विजय थिगळे यांनी २0१४ साली संत भानुदासमहाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित मूकबधिर विद्यामंदिर वर्धनमेरी, वर्धा येथील संस्थेच्या शिक्षक भरतीबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती मागविली होती. मात्र, पुणे अपंग कल्याण आयुक्तालयातील माहिती अधिकारी सुरेश माळोदे यांनी मुदतीच माहिती दिली नाही. माहिती आयोगाकडे झालेल्या सुनावणीत माहिती देण्यास का विलंब झाला,याचा योग्य खुलासा माळोदे करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी माहिती कायद्याचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत आहे. (प्रतिनिधी)