कुलगुरूंचा खुलासा - विद्यार्थिनींचे आंदोलन
By Admin | Published: January 21, 2017 05:53 AM2017-01-21T05:53:06+5:302017-01-21T05:53:06+5:30
एसएनडीटी विद्यापीठाला एक परंपरा आहे. विद्यार्थिनी शिकायला येताना त्यांनी कोणते कपडे घालावेत यावर बंधन आणले नाही
मुंबई : एसएनडीटी विद्यापीठाला एक परंपरा आहे. विद्यार्थिनी शिकायला येताना त्यांनी कोणते कपडे घालावेत यावर बंधन आणले नाही. पत्रकात ‘फॉर्मल’ आणि ‘डिसेंट’ या शब्दांचा वापर केला होता. पण, याचा विपर्यास केला गेला आहे. माझ्या विद्यापीठातील विद्यार्थिनींना या निर्णयावरून काहीच प्रश्न नाही. त्यांचा या निर्णयाला विरोध नाही, असे स्पष्टीकरण एसएनडी विद्यापीठाच्या कुलगुरु प्रा. शशिकला वंजारी यांनी दिले.
एसएनडीटी विद्यापीठाच्या चर्चगेट कॅम्पसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी विद्यापीठात येताना फॉर्मल ड्रेस घालून या, असे पत्रक काढण्यात आले होते. या निर्णयाला विरोध करत विद्यार्थी भारती संघटनेने आज विद्यापीठावर मोर्चा काढला होता. या वेळी विद्यार्थिनींनी शॉर्ट्स घालून ‘तालिबानी’ निर्णय मागे घ्या, अशा घोषणाबाजी केली. विद्यार्थी भारतीच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांना काही काळासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.