अमरावती विभागातील दुष्काळी गावांना सवलत
By admin | Published: May 2, 2016 12:16 AM2016-05-02T00:16:50+5:302016-05-02T00:16:50+5:30
दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या राज्यातील गावांसाठी दोन अतिरिक्त सवलती लागू करण्यास शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील
- संतोष येलकर, अकोला
दुष्काळी परिस्थिती जाहीर केलेल्या राज्यातील गावांसाठी दोन अतिरिक्त सवलती लागू करण्यास शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त ७ हजार २३० गावांना दोन अतिरिक्त सवलतींचा लाभ मिळणार आहे.
गतवर्षीच्या पावसाळ््यात अत्यल्प पाऊस झाल्याने, विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर २०१५-१६ च्या खरीप हंगामात खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये शासनामार्फत दुष्काळी जाहीर करण्यात आली
आहे.
शासनाच्या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त ११ हजार ८६२ गावांना जमीन महसुलात सूट, कृषी पंपांच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सूट, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्फ माफ, आवश्यक तेथे टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविणे आणि शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, अशा उपाययोजना लागू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर २२ एप्रिलच्या निर्णयानुसार खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या ११ हजार ८६२
गावांना अतिरिक्त दोन सवलती
लागू करण्यात आल्या. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांतील गावांना अतिरिक्त दोन सवलतींचा लाभ मिळणार आहे.