राजकारण सोडा, दुष्काळावर चर्चा करा ; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रतिआव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 02:36 AM2018-11-19T02:36:38+5:302018-11-19T02:36:51+5:30

दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर तरी राजकारण करू नका. राज्याच्या हिताचा विचार असेल तर विधिमंडळात चर्चा करा. कोणत्याही चर्चेस उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिले.

Discuss politics, talk about drought; Response to Chief Minister's opponents | राजकारण सोडा, दुष्काळावर चर्चा करा ; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रतिआव्हान

राजकारण सोडा, दुष्काळावर चर्चा करा ; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रतिआव्हान

Next

मुंबई : दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर तरी राजकारण करू नका. राज्याच्या हिताचा विचार असेल तर विधिमंडळात चर्चा करा. कोणत्याही चर्चेस उत्तर देण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना दिले.
मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने ३१ आॅक्टोबरला १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आणखी काही हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर केला. आघाडी सरकारसारखे टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करून आम्ही थांबलो नाही. आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा केला जाईल व आदेशांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे ७५०० कोटी रुपयांच्या अर्थसहाय्याचा प्रस्ताव राज्याने पाठविला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यातील ५० लाख शेतकºयांना आतापर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. त्यांची नावांनिशी यादी आमच्याकडे तयार आहे. बोंडअळीग्रस्त ३५ लाख शेतकºयांना २ हजार २८५ कोटी रुपयांची मदत थेट बँक खात्यात देण्यात आली आहे. यापूर्वी इतकी मदत कधीही देण्यात आलेली नव्हती, असे ते म्हणाले.
शहरी नक्षलवाद्यांबाबतच्या प्रश्नात मुख्यमंत्री म्हणाले की, त्या विषयी पुराव्यासह पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. आता निर्णय न्यायालय देईल. पत्र परिषदेला भाजपा-शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री उपस्थित होते.

Web Title: Discuss politics, talk about drought; Response to Chief Minister's opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.