चर्चा करुन तोडगा काढू -विनोद तावडे
By admin | Published: April 5, 2016 02:10 AM2016-04-05T02:10:13+5:302016-04-05T02:10:13+5:30
जे.जे. रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या मास बंकविषयी सोमवारी रात्री वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी ‘मार्ड’ने चर्चा केली. या चर्चेत
मुंबई : जे.जे. रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या मास बंकविषयी सोमवारी रात्री वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी ‘मार्ड’ने चर्चा केली. या चर्चेत
तावडे यांनी निवासी डॉक्टरांना मास बंक मागे घेण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही बाजू ऐकून घेऊन चर्चा करुन प्रश्न सोडवू, तोपर्यंत मासबंक मागे घ्या, असे आवाहन तावडे यांनी केले आहे.
जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व नेत्र विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्या बदलीच्या मागणीसाठी जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संप सुरु केला आहे.
सोमवारी बाह्यरुग्ण विभाग सुरु होता. विभागात ज्येष्ठ डॉक्टर उपस्थित होते. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले नाहीत. तातडीच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात सुरळीत सुरू होत्या. आठ मोठ्या शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यात डोळ्यांच्या चार शस्त्रक्रियांचा समावेश आहे. आठ प्रसुती झाल्या. बाह्यरुग्ण विभागात तीन हजारांहून अधिक रुग्ण तपासण्यात आले.
रुग्णालयात ४३८ निवासी डॉक्टरांपैकी ३२५ निवासी डॉक्टर संपात सहभागी झाले होते. अन्य ११३ डॉक्टर कामावर हजर होते. अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक व संशोधन विभागामार्फत तयारी सुरु झाल्याची
माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. (प्रतिनिधी)