अशोक कामत यांच्या नावाची चर्चा

By admin | Published: August 6, 2014 12:13 AM2014-08-06T00:13:47+5:302014-08-06T00:13:47+5:30

यंदाचे मराठी साहित्य संमेलन घुमानला होणार असल्याचे जाहीर झाले आहे. सुरूवातीला भारत सासणो आणि श्रीपाल सबनीस ही दोन नावेच चर्चेत होती.

Discussion of Ashok Kamat's name | अशोक कामत यांच्या नावाची चर्चा

अशोक कामत यांच्या नावाची चर्चा

Next
पुणो : यंदाचे मराठी साहित्य संमेलन घुमानला होणार असल्याचे जाहीर झाले आहे. सुरूवातीला भारत सासणो आणि श्रीपाल सबनीस ही दोन नावेच चर्चेत होती. आता मात्र विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे माजी संचालक असलेले डॉ. अशोक कामत यांचे नाव पुढे आले आहे. त्याचबरोबर संत साहित्याचे अभ्यासक असलेले डॉ. सदानंद मोरे आणि रामचंद्र देखणो ही नावेही चर्चेत आहेत. 
यासंदर्भात अशोक कामत यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी या बातमीला दुजोराच दिला. ते म्हणाले, की निवडणूक जाहीर झाली, की मी माझा रीतसर अर्ज भरेन. कुणाशीही स्पर्धा करणो हा माझा स्वभाव नाही. त्यामुळे मी माङया पद्धतीने मतदारांशी संपर्क साधेन. आपण पहिल्यांदाच राज्याच्या बाहेर जाऊन संमेलन घेत आहोत, तेही पंजाबमधे, यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चांगल्या वातावरणात व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कामत यांना घुमान चांगलेच परिचयाचे आहे. आपण तिथे पायी गेलो आहे. तसेच शिखांच्या इतिहासाचे जे तीन खंड आपण लिहिले आहेत ते लिहिताना शीखपंथीयांची खूप मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. 
अनेक वर्षे नामदेवांचे वास्तव्य असलेल्या घुमानमध्ये यंदाचे साहित्य संमेलन होत असल्याने मला अध्यक्षपदासाठी उभे राहण्याचा आग्रह होत आहे. 
मात्र, आपण याबाबतीत कसलाच निर्णय घेतला नसल्याचे रामचंद्र देखणो यांनी सांगितले. ते म्हणाले, की मी नुकताच वारीहून परत आलो आहे. तब्येत थोडी बरी नाही. त्यामुळे आताच या विषयावर काही बोलणो योग्य होणार नाही. कुटुंबीय, मित्र यांच्याशी बोलून यासंदर्भात निर्णय घेईन. (प्रतिनिधी)
 
घुमानमध्ये हे संमेलन होत आहे आणि शीख बांधवांकडून आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे, ते आपले स्वागत करताहेत याचा मला विलक्षण आनंद वाटत आहे. 
-डॉ. अशोक कामत
 
4डॉ. सदानंद मोरे यांनीही याबाबतीत होत असलेल्या चर्चेचा स्पष्ट इन्कार केला नाही. मात्र  ते म्हणाले, की आधी निवडणूक तर जाहीर होऊ दे, मग ती लढवायची की नाही याबाबतीत मी निर्णय घेईन. भारत सासणो आणि श्रीपाल सबनीस यांच्याबरोबर जर कामत, देखणो आणि मोरे हे तिघेही रिंगणात उतरले, तर घुमान संमेलनाची ही निवडणूक अधिक रंगतदार होणार, हे नक्की. 

 

Web Title: Discussion of Ashok Kamat's name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.