भाजपाची रिपाइंबरोबरही चर्चा

By admin | Published: January 18, 2017 01:26 AM2017-01-18T01:26:25+5:302017-01-18T01:26:25+5:30

शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांच्याबरोबरही चर्चा करावी लागत आहे.

Discussion with the BJP's repayments | भाजपाची रिपाइंबरोबरही चर्चा

भाजपाची रिपाइंबरोबरही चर्चा

Next


पुणे : शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षाला रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांच्याबरोबरही चर्चा करावी लागत आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी रिपाइंचे अध्यक्ष महेंद्र कांबळे यांच्याबरोबर सोमवारी सायंकाळी चर्चा केली. रिपाइंने आपली २८ जागांची मागणी कायम ठेवली असून त्या शहराच्या वेगवेगळ्या प्रभागांमधील राखीव जागा आहेत. तिथे रिपाइंचे मतदान असल्याने त्याचा भाजपालाही उपयोग होईल, अशी भूमिका कांबळे यांनी बापट यांच्यापुढे मांडली आहे.
पक्षाचे पालिकेतील गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी ही माहिती दिली. भाजपाबरोबर आमची लोकसभा निवडणुकीपासून युती आहे. पक्षाचे नेते केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीतही ही युती कायम आहे. संपूर्ण शहराचा अभ्यास करून आम्ही या २८ जागा निश्चित केल्या आहेत. त्याचा आम्हाला उपयोग होईलच, शिवाय आमचे मतदान भाजपालाही उपयोगी पडणार आहे, असे डॉ. धेंडे म्हणाले.
भाजपाला प्रस्ताव दिला आहे. त्यांनी यावर पक्ष पदाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करू, असे सांगितले आहे. मंत्री आठवले यांना याबाबत माहिती दिली आहे. मागील निवडणुकीत रिपाइंने १५ जागा लढविल्या होत्या, मात्र या वेळी पक्षासाठी समाजात चांगले
वातावरण आहे. दुसरा पर्याय नसल्यामुळे रिपाइंलाच मतदान
होणार आहे. त्यामुळे जास्त जागांची मागणी करण्यात आली असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. येत्या एक-दोन दिवसांत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे डॉ. धेंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>रिपाइंच्या वतीने भाजपाच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार देण्यात आला आहे. रिपाइंचे पारंपरिक हत्ती हे निवडणूक चिन्ह बऱ्याच वर्षांपूर्वी गोठविण्यात आले. त्यानंतर त्यांनी कपबशी व अन्य काही चिन्हांवर निवडणुका लढविल्या. आता त्यांनी पक्षाच्या वतीने आयोगाकडे संपूर्ण राज्यासाठी रिपाइंच्या उमेदवारांना कपबशी
हे एकच चिन्ह द्यावे, अशी
मागणी केली आहे. ती मान्य झाल्यास रिपाइंचे उमेदवार त्याच चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

Web Title: Discussion with the BJP's repayments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.