मोफा कारवाईसाठी केंद्राशी चर्चा
By admin | Published: July 28, 2016 12:23 AM2016-07-28T00:23:47+5:302016-07-28T00:23:47+5:30
भाजपचे आमदार आणि बांधकाम व्यवसायिक मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात ‘मोफा’ अंतर्गत पुढील कारवाईसाठी पोलीस केंद्राशी चर्चा करत आहेत. त्यानुसार अद्याप याप्रकरणी कोणालाही
मुंबई : भाजपचे आमदार आणि बांधकाम व्यवसायिक मंगलप्रभात लोढा यांच्याविरोधात ‘मोफा’ अंतर्गत पुढील कारवाईसाठी पोलीस केंद्राशी चर्चा करत आहेत. त्यानुसार अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मोफा कायद्यांतर्गत लोढा आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांवर वनराई पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र याप्रकरणी अद्याप कोणाचाही जबाब नोंदवण्यात आलेला नाही.
वनराई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुरव यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आम्ही याप्रकरणी अधिवेशनात माहिती दिली. मात्र त्यानंतरच्या कारवाईसाठी केंद्रीय कायद्याची प्रतीक्षा करत आहोत. जो लवकरच लागू केला जाणार आहे.
दरम्यान, ‘मोफा’अन्वये दाखल झालेल्या गुन्ह्यात आमदार मंगलप्रभात लोढा यांचे नाव नाही. त्याचप्रमाणे याप्रकरणी दाखल पहिली तीन नावे ही लुपिन फार्मा या विकासकांची असल्याचे लोढा समूहातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तक्रारदार पी.के.अगरवाल यांच्याशी लोढा समूहातर्फे कोणताही व्यावसायिक व्यवहार अथवा विक्री व्यवहार करण्यात आलेला नाही. हा दोन उद्योजकांमधील वाद आहे. त्याच्याशी लोढा समुहाचा काहीही संबंध नाही. त्याबाबत कायदेशीर कार्यवाही करण्यात येत असल्याचे लोढा समुहातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)