गिरीश महाजन भुजबळांच्या भेटीला, बंद खोलीत झाली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 18:20 IST2018-06-03T18:19:58+5:302018-06-03T18:20:17+5:30
छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांचं राजकीय वजन वाढताना दिसत आहे.

गिरीश महाजन भुजबळांच्या भेटीला, बंद खोलीत झाली चर्चा
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी विविध राजकीय नेत्यांची रिघ लागली आहे. त्यातच आज भाजपाचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. सांताक्रुझमधील भुजबळांच्या निवासस्थानी जाऊन महाजनांनी छगन भुजबळांशी चर्चा केली. भुजबळ-महाजन यांच्या भेटीमुळं वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दोघामध्ये बंद खोलीत चर्चा झाली. दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली ते अद्याप गुलदस्त्यात आहे.
छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांचं राजकीय वजन वाढताना दिसत आहे. त्यामुळेच गिरीश महाजनांसोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत चर्चाही सुरु झाल्या आहेत. दरम्यान भुजबळ यांची विचारपूस करण्यासाठी गिरीश महाजन भेटीला गेल्याचा अंदाज काही राजकीय नेत्यांनी वर्तवला आहे.
काल शनिवारीच शरद यादव यांनी भुजबळांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली होती. तसंच लालूप्रसाद यादवांनीही भुजबळांशी फोनवरुन बातचीत केली होती.