विधीमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर हवी चर्चा - संभाजी राजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 08:43 PM2021-07-04T20:43:05+5:302021-07-04T20:43:42+5:30

Sambhaji Raje Demands Discussion on Maratha reservation : विधीमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर चर्चा करा अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली.

Discussion on the issue of Maratha reservation in the session of the Legislature - Sambhaji Raje | विधीमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर हवी चर्चा - संभाजी राजे

विधीमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर हवी चर्चा - संभाजी राजे

googlenewsNext

अकोला: मराठा आरक्षणासाठी समाजातील मंत्री, खासदार व आमदार इत्यादी लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला पाहीजे असे आवाहन करीत राज्य विधीमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर चर्चा करा अशी मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली.

मराठा समाज जनसंपर्क दौरा अंतर्गत सकल मराठा समाज अकोला जिल्हा शाखेच्यावतीने रविवारी अकाेला शहरातील मराठा मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून लढाई लढण्याची ही वेळ नसून मराठा आरक्षणासाठी आता कायद्याची लढाई लढणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मागासवर्गीय आयोग नेमणे हाच आता पर्याय असून, त्यासाठी भोसले समितीच्या सूचना राज्यपालांकडे सादर करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यानंतर यासंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा आणि केंद्र सरकारने राष्ट्रपतींकडे प्रस्ताव सादर करुन वटहुकूम काढावा, असे संभाजी राजे यांनी सांगीतले. मराठा आरक्षण हा वादाचा नाही तर पर्यायाचा विषय आहे त्यामुळे अधिवेशन हे दाेन दिवसांचे असले तरी किमान दाेन तास चर्चा करायला हरकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर समाजातील लोकप्रतिनिधींनी बोलले पाहीजे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी करण गायकर, अंकुश कदम, विनोद साबळे, विलास पांगारकर, गंगाधर काळकुटे, विश्वनाथ वाघ, आप्पासाहेब कुडेकर, रमेश केरे यांच्यासह स्वागताध्यक्ष कृष्णा अंधारे, विनायकराव पवार विचारपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी तर संचालन व आभारप्रदर्शन ॲड संतोष गावंडे, पूजा काळे यांनी केले. या कार्यक्रमाला सकल मराठा समाज जिल्हा शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Web Title: Discussion on the issue of Maratha reservation in the session of the Legislature - Sambhaji Raje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.