साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठी ‘पानिपत’कारांचे नाव चर्चेत
By Admin | Published: August 26, 2015 01:39 AM2015-08-26T01:39:58+5:302015-08-26T01:39:58+5:30
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे ‘बिगुल’ वाजल्यामुळे इच्छुक साहित्यिकांची मतदारांच्या भेटीगाठींसाठी लगबग
पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे ‘बिगुल’ वाजल्यामुळे इच्छुक साहित्यिकांची मतदारांच्या भेटीगाठींसाठी लगबग सुरू झाली आहे.संमेलनाध्यक्षपदासाठी कवी विठ्ठल वाघ, शरणकुमार लिंबाळे, डॉ. श्रीपाल सबनीस, जनार्दन वाघमारे, रवींद्र शोभणे, चंद्रकुमार नलगे यांच्यासह ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांचेही नाव चर्चेमध्ये आहे. दरम्यान डॉ. सबनीस यांनी मंगळवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. तसेच विठ्ठल वाघही अर्ज दाखल करणार आहेत.
गेल्या चार वर्षांपासून संमेलनाध्यक्षपदासाठी आपण उभे राहावे, अशी मागणी साहित्य वर्तुळामधून होत आहे. सध्या लिहिण्यात मग्न आहे, त्यामुळे अजून विचार केलेला नाही.
- विश्वास पाटील,
ज्येष्ठ लेखक
साहित्य संमेलनाचे नक्की प्रयोजन काय आहे? त्याची गरज? हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यातच दाभोळकर, पानसरे यांचे खून झाले, विवेकवादाला मूठमाती देत धर्माचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. या मुद्यांसह नवीन लेखक, कवींचे प्रश्न समजून घेण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरलो आहे.- विठ्ठल वाघ, ज्येष्ठ कवी