दहावीच्या नवीन पाठ्यपुस्तकांवर ४ एप्रिल रोजी चर्चासत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 04:34 PM2018-03-26T16:34:26+5:302018-03-26T16:34:26+5:30
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या वतीने इयत्ता १ली ते १२वी पर्यंतच्या शालेय पुस्तकांची निर्मिती करण्यात येते. यावर्षी शैक्षणिक वर्ष २०१८ -२०१९ करिता इयत्ता दहावीची सर्व माध्यमांची पुस्तके नवीन अभ्यासक्रम आराखड्यानुसार तयार करण्यात येत आहेत.
मुंबई - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या वतीने इयत्ता १ली ते १२वी पर्यंतच्या शालेय पुस्तकांची निर्मिती करण्यात येते. यावर्षी शैक्षणिक वर्ष २०१८ -२०१९ करिता इयत्ता दहावीची सर्व माध्यमांची पुस्तके नवीन अभ्यासक्रम आराखड्यानुसार तयार करण्यात येत आहेत. या नवीन अभ्यासक्रमावर आधारित पुस्तकाविषयी चर्चासत्राचे आयोजन ४ एप्रिल रोजी सकाळी १०. ३० वा. शिवाजी नाट्य मंदिर, दादर (प) मुंबई - २८ येथे करण्यात आले आहे.
इयत्ता दहावीच्या या नवीन पाठ्यपुस्तकांची ओळख व्हावी, पाठ्यपुस्तकांचे स्वरूप समजावे, मूल्यमापन प्रक्रिया इत्यादीबाबत चर्चा व्हावी या हेतूने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. तसेच या चर्चासत्रात सर्व विषयाच्या विषय समित्यांचे अध्यक्ष मार्गदर्शन करणार असून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या शंकाचे निरसन केले जाणार आहे. सदर चर्चासत्रास उपस्थित राहण्यासाठी प्रवेशपत्रिका आवश्यक असून एका प्रवेशपत्रिकेवर विद्यार्थी व पालक असे दोन जण उपस्थित राहू शकतात. कार्यक्रमाच्या प्रवेशपत्रिका खालील ठिकाणी मर्यादित स्वरूपात विनामूल्य उपलब्ध आहेत.
१. श्री गणेश बुक सेंटर
एस. व्ही. रोड
बोरिवली ( पश्चिम)
मुंबई - ४०००९२
संपर्क : ०२२-२८०५१२५१
२. एच. के. बुक एजन्सी
शिवकृपा इंडस्ट्री इस्टेटच्या मागे,
सूर्यनगर , एल बी एस मार्ग
विक्रोळी ( पश्चिम )
संपर्क : ९३२२४१२३४४
३. धनलाल ब्रदर्स
७५,एस गांधी मार्ग , देवकरण मेन्शन नं. १ एस/८
प्रिन्सेस स्ट्रीट, मुंबई -४००००२
संपर्क : ०२२-२२०१७०२७
४. आयडियल बुक डेपो
दादर (प), मुंबई ४०००२८
०२२-२४३०२१२६
५. जवाहर बुक डेपो
विलेपार्ले (प) मुंबई
९८३३६८८५९३
६. विकम बुक डेपो
टी. एम. खारकर आळी रोड
जांभळी नाका, ठाणे( प )
०२२- २५३९४८८२
७. मे. राकेश बुक स्टे. कं. प्रा. लि.
पनवेल , संपर्क : ९३२२२६४०७६
८. मे. गणेश जनरल स्टोअर्स
डोंबिवली, संपर्क : ९९८७२०८६७९