सिक्कीम दौऱ्याच्या फलनिष्पत्तीची चर्चा

By admin | Published: May 18, 2016 02:13 AM2016-05-18T02:13:41+5:302016-05-18T02:13:41+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरांसह पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे पथक सिक्कीमच्या दौऱ्यावर गेले होते.

Discussion of Sikkim tourism event | सिक्कीम दौऱ्याच्या फलनिष्पत्तीची चर्चा

सिक्कीम दौऱ्याच्या फलनिष्पत्तीची चर्चा

Next


पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरांसह पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांचे पथक सिक्कीमच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्याच्या फलनिष्पत्तीविषयी चर्चा महापालिका वर्तुळात होती. साडेआठ लाखांचा खर्च वाया गेला आहे, अशी टीका होत आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील नगरसेवक पदाधिकारी दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर गेले असताना पिंपरी-चिंचवडचे पदाधिकारी सिक्कीम दौऱ्यावर गेले होते. याबाबत विरोधकांनी टीका करूनही पदाधिकाऱ्यांनी दौरा पूर्ण केला. त्यात महापौर शकुंतला धराडे यांच्यासह माजी महापौर अपर्णा डोके, नंदा ताकवणे, नारायण बहिरवाडे, मोरेश्वर भोंडवे, तानाजी खाडे या नगरसदस्यांसह अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी असे पथक गेले होते. या दौऱ्यासाठी एकूण १४ जणांचे नियोजन केले होते. मात्र, त्यातील काही जण ऐनवेळी रद्द झाले.
पिंपरी-चिंचवडच्या शिष्टमंडळाने राज्यपाल श्रीनिवास पाटील यांची भेट घेतली. या वेळी कृषी विभागाचे सचिव अनिल बगम उपस्थित होते. लोकसंख्या, अर्थसंकल्पासह पीक घेण्याचे क्षेत्र, सेंद्रिय खतनिर्मिती, नियमांचे पालन कसे होते, शून्य कचरा प्रकल्प, कचरा उघड्यावर टाकल्यानंतर कारवाई होते का? अशी माहिती सदस्यांनी घेतली.(प्रतिनिधी)

Web Title: Discussion of Sikkim tourism event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.