महापालिका आयुक्तांच्या सिक्स पॅकची चर्चा

By admin | Published: April 1, 2017 02:44 AM2017-04-01T02:44:13+5:302017-04-01T02:44:13+5:30

पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्या ‘सिक्स पॅक बॉडी’चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Discussion of Six Pack of Municipal Commissioner | महापालिका आयुक्तांच्या सिक्स पॅकची चर्चा

महापालिका आयुक्तांच्या सिक्स पॅकची चर्चा

Next

पुणे : पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांच्या ‘सिक्स पॅक बॉडी’चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या पर्सनल ट्रेनरकडून ‘वर्षांपूर्वी आणि आता’ असे आशय असलेले हे छायाचित्र आहे. त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
एक वर्षापूर्वीचा व आताचा सिक्स पॅकची बॉडी दाखविणारा असे दोन फोटो असलेली पोस्ट सध्या व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हायरल झालेली आहे. अवघ्या एका वर्षात त्यांनी व्यायाम करून हा बदल घडविला असल्याचे या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांचे ट्रेनर यांनी फेसबुकवर ही पोस्ट टाकली होती. या पोस्टला हजारो लाइक्स मिळाल्या आहेत, त्याचबरोबर व्हॉट्स अ‍ॅपच्या अनेक ग्रुपवरून ती शहरात मोठ्या प्रमाणात फिरली आहे. कुणाल कुमार यांनी १४ मार्च २०१६ रोजी व्यायामाला सुरुवात केली होती. त्यानंतर एक वर्षभर त्यांनी व्यायाम केला. त्याचबरोबर ट्रेनरच्या सूचनेनुसार त्यांनी योग्य तो डाएट घेतला. त्यामुळे अवघ्या एका वर्षात सिक्स पॅकची बॉडी बनविल्याचे त्यांच्या ट्रेनरने टाकलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजेसमध्ये, आयुक्तांनी स्वत:च्या शरीरापेक्षा शहराच्या सुदृढतेकडे अधिक लक्ष दिले असते तर ते योग्य झाले असते, अशा भावना पुणेकरांकडून व्यक्त केल्या जात आहेत. महापालिका आयुक्त या वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचे फोटो असे व्हाइरल होणे योग्य नाही, अशी चर्चाही आहे. हा जाहिरातीचाच प्रकार असल्याचे आक्षेपही घेण्यात येत आहेत.

महापालिकेच्या आयुक्तपदावरील व्यक्तीने अशा प्रकारे स्वत:चा उघडा फोटो सोशल मीडियावर तसेच फेसबुकवर टाकणे अयोग्य आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. व्यक्तीपेक्षा पदाची प्रतिष्ठा जपणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांनी हे छायाचित्र सोशल मीडियावरून काढून टाकावे. निदान फेसबुकवरील छायचित्र तरी हटवले पाहिजे.- विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

Web Title: Discussion of Six Pack of Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.