'ही तर शेतकऱ्यांची फसवणूक';कर्जमाफीच्या मुद्यावरून 'ठाकरे सरकार'वर नेटकऱ्यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 02:18 PM2019-12-28T14:18:46+5:302019-12-28T14:19:21+5:30
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यावर सरसकट कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना २०१९ चा अध्यादेश काढला आहे. मात्र या कर्जमाफीच्या योजनेत व्याज आणि मुद्दल मिळून दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. तर ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे प्रतिक्रिया आता सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ता आल्यावर सरसकट कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने कर्जमाफीची घोषणा सुद्धा केली. मात्र 2 लाखांपर्यंत कर्जाची रक्कम असलेल्या शेतकऱ्यांच या कर्जमाफीचा लाभ होणार असल्याची अट सरकारने घातली आहे. त्यामुळे सोशल मिडियावर या मुद्यावरून प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांना मागच्या दोनदार वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे व मातीमोल भावामुळे नुसकान होत आहे आणि अश्या शेतकर्यांचे थकित कर्ज दोनलाख ते पाचलाखा पर्यंत आहे
— Śwàrûp Ŕahâne (@swaruprahane88) December 28, 2019
अश्या शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफीच्या अटीशर्ती मध्ये अडकवून त्याला डावलले आहे
अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे@OfficeofUT