डासांनी वाढतो रुग्णाचा ताप

By admin | Published: May 18, 2016 01:39 AM2016-05-18T01:39:21+5:302016-05-18T01:39:21+5:30

शहरात डासांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने पिंपरीकरांचे आरोग्य संकटात आले

Disease increases the patient's temperature | डासांनी वाढतो रुग्णाचा ताप

डासांनी वाढतो रुग्णाचा ताप

Next


पिंपरी : शहरात डासांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने पिंपरीकरांचे आरोग्य संकटात आले आहे. शहरात डासांच्या चाव्यामुळे होणाऱ्या तापाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. पावसाळ्याचा हंगाम सुरू होणार असल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होऊन रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या साडेचार महिन्यांत शहरात विविध आजाराचे रुग्ण सापडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, तीन वर्षांपासून संूपर्ण पिंपरीकराना वेठीस धरणाऱ्या डेंगीने या वर्षी डोके वर काढले आहे. चिकनगुनियाचेही रुग्ण आढळत आहेत. पण शासकीय दवाखान्यात याचा एक ही रुग्ण अद्यापही दाखल झालेला नाही.
शहरात दरवर्षी पावसाळ््याच्या अगोदर डासांचा प्रादुर्भाव सुरू होतो आणि पावसाळ््यात ठिकठिकाणी पाणी साठून डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढते. या डासांच्या चाव्यामुळे डेंगी, चिकुनगुनियाचे आणि मलेरिया हे आजार पसरतात. गेल्या तीन वर्षांपासून शहरात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांची संख्या वर्षाकाठी ३ हजारांच्या पुढे जात आहे. २०१४ मध्ये शहरात डेंगीची लागण झालेले २ हजार ९६० रुग्ण सापडले होते, तर २०१५ मध्ये ३ हजार ६५१ रुग्ण रुग्ण सापडले होते. मात्र या काळात चिकुनगुनियाचे आणि मलेरियाचे रुग्ण सापडले नव्हते.
शहरामध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. २०१४ मध्ये ९२ हजार ७९८ जणांना तापाचा आजार झाला होता. तर २०१५मध्ये हीच संख्या १ लाख ३ हजार सहाशे ३९वर गेली होती. २०१४ मध्ये ७२ जणांना मलेरियाचा प्रार्दूभाव झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर २०१५ मध्ये ७१ जणांना मलेरियाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते. २०१६मध्ये २ जणांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
।पावसाळ््याचा हंगाम तोंडावर आला आहे. पावसाळ््यात ठिकठिकाणी डबकी साचून त्यात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होते. त्यामुळे चिकुनगुनियाचे रुग्ण येत्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतील, अशी भीती आहे.
।रुग्ण वाढण्याची भीती
पावसाळ््याचा हंगाम सुरू होणार असल्याने डासांची पैदास मोठ्या प्रमाणावर होऊन चिकुनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या साडेचार महिन्यांत शहरात चिकुनगुनियाचे तब्बल १२७ रुग्ण सापडले आहेत.
।या वर्षी डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असून चिकुनगुनियाच्या रुग्ण आढळले नाहीत
।चिकुनगुनिया हा आजार डासांनी चावल्यामुळे होतो. चिकुनगुनियाचे विषाणू डास एकाच्या शरीरातून दुसऱ्याच्या शरीरात पोहोचवितात.
।चिकुनगुनियाची लागण झाल्यास ताप येणे, संपूर्ण अंग दुखणे ही प्राथमिक लक्षणे दिसू लागतात.
।वेळीच उपचार घेतले नाहीत तर हा आजार बळावतो आणि रुग्णाचे सर्व सांधे आखडून जातात आणि तेथे प्रचंड वेदना होतात. या वेदना एक-दोन महिने राहू शकतात.
।गेल्या तीन वर्षांपासून शहरात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांची संख्या वर्षाकाठी ३ हजारांच्या पुढे जात आहे.
।चिकुनगुनिया रोखण्यासाठी हे उपाय करा
पाणी उघड्यावर ठेवू नका.
कचऱ्याचा डबा बंद ठेवा.
कचरा डब्यातच टाका. बाहेर फेकू नका.
गळके नळ बंद करा. नळ चालू ठेवू नका.
घराच्या खिडक्या झोपताना बंद करा.
झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.

Web Title: Disease increases the patient's temperature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.