घातपात झाला यशस्वी पण लक्ष्य चुकले

By admin | Published: June 13, 2016 03:33 AM2016-06-13T03:33:32+5:302016-06-13T03:33:32+5:30

कटामध्ये अग्रभागी राहिलेल्या सातपाटी येथील ९० वर्षीय स्वातंत्र्य सैनिक विनायक म्हात्रे यांचे शनिवारी निधन झाले.

Disease succeeded but missed the target | घातपात झाला यशस्वी पण लक्ष्य चुकले

घातपात झाला यशस्वी पण लक्ष्य चुकले

Next


पालघर : १९४२ च्या चलेजाव आंदोलनात इंग्रजाच्या गोळीबारात मृत्यू पावलेल्या आपल्या सहकाऱ्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लष्कराची दारूगोळ्याने भरलेली रेल्वे पाडण्याच्या कटामध्ये अग्रभागी राहिलेल्या सातपाटी येथील ९० वर्षीय स्वातंत्र्य सैनिक विनायक म्हात्रे यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता.शासनाच्यावतीनेही त्यांना पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
पालघर तालुक्यातील सातपाटी हे गांव मासेमारीचे बंदर म्हणून परिचित असले तरी पालघर जिल्ह्यातील सर्वात जास्त स्वातंत्र्य सैनिक (४७) सातपाटी येथे आहेत. स्वातंत्र्य चळवळी चे महत्वपूर्ण केंद्र म्हणून स्वातंत्र्य संग्रामातील नेते सातपाटीमध्ये जमत होते.
देशभर इंग्रजांविरोधात चलेजावचे आंदोलन सुरु असतांना पालघरमध्ये ही १४ आॅगस्ट १९४२ रोजी कार्यकर्ते इंग्रजांविरोधात घोषणा देत कचेरीच्या दिशेने निघाले असतांना इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात काशीनाथ भाई पागधरे, गोविन्द ठाकुर, रामप्रसाद तिवारी, सुकुर मोरे, रामचंद्र चुरी या पाच स्वातंत्र्यवीराना हौतात्म्य प्राप्त झाले होते.
याचा बदला घेण्यासाठी टपलेल्या तरुण स्वातंत्र्य सैनिकांना याच वेळी मुंबईहून दारूगोळा भरलेली रेल्वे पालघर मार्गे जाणार असल्याची माहिती सातपाटीचे जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक नारायण दांडेकर यांच्या द्वारे मिळाली. ही गाडी उडवून द्यायची असा कट जमलेल्या सर्वानी रचला. नारायण दांडेकरा च्या नेतृत्वाखाली हे काम करायचे असे ठरवित सर्व कामाला लागले. दांडेकरांनी ही गाडी केव्हा सुटणार याचा तपास करायचा, नांदगांवच्या यादव पाटील यांनी रुळ उखडण्या बाबत माहिती गोळा करायची,नरोत्तम पाटील यांनी पुलाची पाहणी करायची असे सर्वानुमते ठरले.
२६ आॅक्टोबरला दारू गोळा भरलेली गाडी मुंबईहून सुटणार असा निरोप नारायण दांडेकर यांनी दिल्या नंतर सर्वं कामाला लागले. विनायक म्हात्रे सह त्यांच्या ८ ते १९ मित्रांनी संध्याकाळी आपल्या मच्छीमारी नौका किनाऱ्या वर मसेमारीला जायचे म्हणून सज्ज ठेवल्या. रात्रीच्या अंधारात सातपाटीमधून सर्व जन खारेकुरणच्या मार्गाने पंचाळीच्या पुलाजवळ जमले. मात्र गाडी येण्याची वेळ झाली असतांना रुळ उखडण्यात बाकबगार असलेले यादव पाटील घटना स्थळी पोहचले नसल्याने सर्व चिंताग्रस्त होते. शेवटी खूप उशीर झाल्याने रात्रो १२ च्या दरम्यान सर्व कार्यकर्त्यांनी रुळाचे नटबोल्ट काढायला सुरूवात केली आणि रुळाचा एक मोठा भाग उचकटून फेकून देण्यात ते यशस्वी ठरले. याच वेळी गाडी जवळ येत असल्याचा आवाज त्यांच्या कानी पडला आणि गाडी उलटल्या नंतर दारूगोळ्याचा स्फोट होईल हा धोका ओळखून सर्व लांब उभे राहिलो. इंजिन पुढे जाताच २८ ते ३० डबे कोसळले. म्हात्रेंसह त्यांच्या सहकाऱ्यांनी किनाऱ्यालगत नांगरुन ठेवलेल्या नौकेतून आपपली गावे गाठली होती.
मृत्यूच्या दाढेत शिरून आपण किती मोठे साहस केले यांचा जराही थांगपत्ता नातेवाईकांसह गावकऱ्यांना लागू दिला नसल्याचा पराक्र म त्यांनी लोकमतला कथन केला होता. समुद्रातून परत आल्या नंतर आपल्या घातपातामुळे दारूगोळा नेणारी गाडी न पडता सुरक्षेची चाचणी घेण्यासाठी पुढे पाठविलेली गाडी पडली हे कळाल्या नंतर आम्ही खूप निराश झालो असे त्यांनी सांगितले होते. त्यांचे शनिवारी 90 व्या वर्षी निधन झाले. उपजिल्हाधिकारी डॉ.स्नेहल कनीचे यांनी त्यांचे दर्शन घेऊन शासनाच्यावतीने त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

Web Title: Disease succeeded but missed the target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.