दिशा कायदा होणार नागपूर अधिवेशनात; अनिल देशमुख यांचे बैठकीत आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 03:29 AM2020-10-07T03:29:43+5:302020-10-07T07:24:12+5:30

महिलांवरील अत्याचार रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांसंदर्भात विविध पक्षसंघटनांच्या महिला नेत्यांची बैठक अनिल देशमुख यांनी घेतली.

disha Act to be passed in winter session says home minister Anil Deshmukh | दिशा कायदा होणार नागपूर अधिवेशनात; अनिल देशमुख यांचे बैठकीत आश्वासन

दिशा कायदा होणार नागपूर अधिवेशनात; अनिल देशमुख यांचे बैठकीत आश्वासन

Next

मुंबई : महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोर शासन करण्यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायद्यासंबंधीचे विधेयक विधिमंडळाच्या आगामी नागपूर अधिवेशनात मांडण्यात येईल, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी एका बैठकीत दिले.

महिलांवरील अत्याचार रोखण्यासंदर्भातील उपाययोजनांसंदर्भात विविध पक्षसंघटनांच्या महिला नेत्यांची बैठक अनिल देशमुख यांनी घेतली. दिशा कायदा व्हावा, यासाठी सर्वात आधी महाविकास आघाडी सरकारनेच पुढाकार घेतला होता, त्यासाठी आपण स्वत: आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी हैदराबादला गेलो होतो. ज्येष्ठ आयपीएस अधिकारी अश्वती दोरजे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. त्याचे सादरीकरण मंत्रिमंडळ बैठकीत झाले. राज्य मंत्रिमंडळाची एक उपसमितीही या संदर्भात नेमण्यात आली आहे. कोरोनामुळे या संदर्भातील कार्यवाही होऊ शकली नाही. मात्र, आगामी नागपूर अधिवेशनात या कायद्याचे विधेयक मांडून ते मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल आणि त्याला सर्वपक्षीय पाठिंबा नक्कीच राहील, असे देशमुख यांनी बैठकीत सांगितले.

या बैठकीत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आ.मनिषा कायंदे, आ.यामिनी जाधव, मीना कांबळी, सरोज राव, नीला लिमये, ज्योती ठाकरे, रूपाली चाकणकर यांनी विविध सूचना केल्या. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, सतेज पाटील आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title: disha Act to be passed in winter session says home minister Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.