सामोसा चटणीत उंदीर निघाल्याचा कट बदनामीसाठी : दुकानदाराचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 06:46 PM2018-09-15T18:46:56+5:302018-09-15T18:47:11+5:30
पुण्यात सामोसाच्या चटणीत सापडलेल्या उंदरामुळे गोंधळ उडाला असताना या संबंधी बदनामीचा कट रचल्याचा गंभीर आरोप दुकानदाराने केला आहे.
पुणे : पुण्यात सामोसाच्या चटणीत सापडलेल्या उंदरामुळे गोंधळ उडाला असताना या संबंधी बदनामीचा कट रचल्याचा गंभीर आरोप दुकानदाराने केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील कमला नेहरु हॉस्पिटलजवळच्या शारदा स्वीट्समधून आणलेल्या सामोसा चटणीत उंदीर निघाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुरुवातीला हा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने दुकान बंद करण्याचे आदेश दिले.
यावर दुकानदार रामकिशन परदेशी यांनीही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, एका ग्राहकाने जवळपास 200 समोसे आपल्या दुकानातून खरेदी केले होते. मात्र काही वेळात हा ग्राहक 20-25 जणांसह पुन्हा आपल्या दुकानात आला. त्यानंतर त्याने चटणीमध्ये उंदिर असल्याचं सांगितले.तेव्हा संबंधित ग्राहकाने पोलीस तक्रार करण्याची धमकी देत परदेशी यांच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र परदेशी यांनी या ग्राहकाला 40 हजार रुपये दिले होते. मात्र प्रकरण पैसे देऊन मिटवल्यानंतरही हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने हे प्रकरण प्रकाशात आले असल्याचे म्हटले आहे.