मोदी सरकारकडून अपेक्षाभंग
By admin | Published: July 8, 2014 12:47 AM2014-07-08T00:47:20+5:302014-07-08T00:47:20+5:30
अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे.
Next
नवी मुंबई : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रातील मोदी सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. रेल्वे प्रवासी भाडय़ाबरोबरच आता पेट्रोल, डिङोल, गॅसच्या किमती वाढवून मोदी सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनता याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात आज राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी पवार बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, ठाणो जिल्हय़ाचे पालकमंत्री गणोश नाईक, सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव उपस्थित होते. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5क् टक्के आरक्षण देण्यात आले. मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. अन्नसुरक्षा योजना सुरू झाली. राज्यातील शेतक:यांचे 81 कोटींचे कर्ज माफ करण्यात आले, अशी माहिती पवार यांनी या वेळी दिली.
पनवेल-कळंबोली-सायन मार्ग टोलमुक्त करण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या वेळी उपमुख्यमंत्र्यांकडे केली. मागील पाच वर्षात शेतक:यांची कर्जमाफी, अन्नसुरक्षा योजना, महिलांना आरक्षण, महिला सुरक्षा विधेयक असे महत्त्वाचे निर्णय केंद्रात आणि राज्यात आघाडी सरकारने घेतले. कार्यकत्र्यानीही विकासकामे जनतेर्पयत पोहोचवावी, असे आवाहन तटकरे यांनी या वेळी केले.
झोपडपड्डय़ांचा सर्वागीण विकास, सिडकोच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न, गावठाणांचा विकास, औरंगाबादच्या धर्तीवर नवी मुंबईतील सिडकोच्या जमिनी फ्री-होल्ड कराव्यात, अशा महत्त्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य सरकार सक्षम असून आगामी कालावधीत त्याची पूर्तता होईल, असा विश्वास पालकमंत्री गणोश नाईक यांनी या वेळी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
ठाणो जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढते आहे. त्यामुळे जिल्हय़ातील विधानसभेच्या 24 जागांपैकी 12 ते 14 जागांवर राष्ट्रवादी आपला दावा करणार असून, या सर्व जागांवर आम्हाला एकहाती विजय मिळेल, असा विश्वास पवार यांनी वाशी येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.