वेगळ्या विदर्भासाठी कायदेभंग चळवळ
By Admin | Published: August 4, 2016 04:21 AM2016-08-04T04:21:45+5:302016-08-04T04:21:45+5:30
वेगळा विदर्भ मिळविण्यासाठी लढा आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी दिले
योगेश पांडे,
नागपूर- वेगळा विदर्भ मिळविण्यासाठी लढा आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी दिले आहे. विदर्भ मिळविण्यासाठी आम्ही महात्मा गांधींच्या मार्गावर चालणार असून हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर कायदेभंग चळवळ उभारण्यात येईल, अशी माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शिवाय मंगळवारी विदर्भवासी काँग्रेस नेत्यांनी स्वपक्षीय नेत्यांवरच केलेल्या टीकेचेदेखील अजिबात आश्चर्य वाटले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधिमंडळात वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून जे काही सुरू आहे ते सर्व जनता पाहत आहे. विदर्भातील जनता वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून बाजू मांडताना भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपा वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे, परंतु ते वेगळे विदर्भ राज्य कधी देतील, याबाबत शंका आहे. भाजपाने लवकर वेगळा विदर्भ द्यावा, ही आमची मागणी आहे. त्याची पूर्तता न झाल्यास २०१७ सालातील पहिल्या महिन्यापासूनच कायदेभंग चळवळ उभारण्यात येईल, असे अॅड. अणे म्हणाले.
>२०१७ मध्ये चळवळ उभारणार
हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर कायदेभंग चळवळ उभारण्यात येईल, असे अॅड. श्रीहरी अणे यांनी स्पष्ट के ले.
२०१७ सालातील पहिल्या महिन्यापासूनच कायदेभंग चळवळ उभारण्यात येईल.