विधान परिषद बरखास्त करा : गोटे
By admin | Published: March 31, 2017 01:40 AM2017-03-31T01:40:20+5:302017-03-31T01:40:20+5:30
विधान परिषदेमध्ये अप्रत्यक्ष निवडून येणारे आमदार सरकारची गळचेपी करतात. तेथील सदस्य त्यांना
मुंबई : विधान परिषदेमध्ये अप्रत्यक्ष निवडून येणारे आमदार सरकारची गळचेपी करतात. तेथील सदस्य त्यांना अधिकार नसताना दांडगाई करून लोकहिताचे ठराव अडवितात. त्यामुळे विधान परिषद बरखास्तच करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी आज विधानसभेत केली.
काल हीच मागणी मी सभागृहात केली तर माझी वाक्ये कामकाजातून काढून टाकण्यात आली होती. मात्र, या सभागृहात आधीही विधान परिषद बरखास्तीची मागणी झालेली होती, असे सांगत गोटे यांनी काही दाखले दिले. ते म्हणाले की, याच विधानसभेत १४ डिसेंबर १९५३ रोजी २१९पैकी २१६ आमदारांनी विधान परिषद बरखास्त करावी, असा ठराव मंजूर केला होता. विधान परिषदेची व्यवस्था हे ब्रिटिश कारभाराचे अंधानुकरण आहे, अशी टीका तेव्हा केली होती.