औषधांपासून मनोरुग्ण वंचित

By admin | Published: February 7, 2017 05:00 AM2017-02-07T05:00:00+5:302017-02-07T05:00:00+5:30

दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. वेळेत औषधोपचार केल्यास त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. मात्र, सरकारी अनास्थेमुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे

Disorders of drugs from medicines | औषधांपासून मनोरुग्ण वंचित

औषधांपासून मनोरुग्ण वंचित

Next

सुमेध वाघमारे, नागपूर
दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. वेळेत औषधोपचार केल्यास त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. मात्र, सरकारी अनास्थेमुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. बाह्यरुग्ण विभागात ५० टक्के औषधांचा तुटवडा आहे. यातच रुग्णालयात नसलेली औषधे लिहून देणे हे नियमबाह्य ठरत असल्याने रुग्ण औषधांपासून वंचित राहत आहे. परिणामी, आजार बळावत असल्याची धक्कादायक माहिती आहे.

प्रादेशिक रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज २५० वर रुग्ण येतात. यातील बहुसंख्य रुग्णांवर महिनोंमहिने उपचार करावे लागतात. गरीब मनोरुग्णांसाठी हे रुग्णालय आशेचा किरण आहे. परंतु लालफितीचा मनमानी कारभार, अपुरा निधी, डॉक्टरांची कमतरता, पर्यायी उपचारांची वानवा अशा त्रुटींमुळे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. यातच गेल्या महिन्यांपासून आवश्यक व तातडीने लागणारी औषधेही नसल्याने मनोरुग्णांचे हाल होत आहेत. सूत्रानुसार, ‘अ‍ॅण्टी सायोकोटीक’ सारखेच मिरगीवरील ‘अ‍ॅण्टी इपिलेप्टिक’ औषधांचे सात ते आठ प्रकार आहेत. परंतु यातील केवळ दोनच प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. तणावावर उपयुक्त असलेले ‘एन्टी डिप्रेशन’ औषधेही पुरेशी नाहीत.


मिरगीच्या
औषधांचाही अभाव
मिरगीच्या रुग्णांना दिले जाणारे ‘इपिटॉइन’ औषधांचाही तुटवडा आहे. ‘पॅसीटेन’, ‘लोराझीपॉम’ आदी महत्त्वाचे औषध नाहीत. येथील डॉक्टरांना रुग्णालयात नसलेली औषधे बाहेरून विकत घेण्यासाठी लिहूनही देता येत नाहीत. असे केल्यास रुग्ण ‘१०४’ क्रमांकावर तक्रारी करू शकतात. यामुळे डॉक्टर आवश्यक औषधे लिहून न देता पर्यायी औषधे देऊन वेळ भागवून नेत असल्याचे चित्र आहे.



स्थानिक पातळीवर औषधांची खरेदी
रुग्णालयात औषधेच नाहीत, असे नाही. जी औषधे नाहीत त्याच्या पर्यायी औषधे दिली जात आहेत. रुग्णालयात जी औषधे नाहीत त्याची माहिती मिळताच सोमवारी पाच हजार रुपयांची औषधे खरेदी करण्यात आली आहेत. या शिवाय औषधांसाठी मोठा निधी लवकरच रुग्णालयाला उपलब्ध होणार आहे.
-डॉ. आर.एस. फारुखी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय

Web Title: Disorders of drugs from medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.