पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यावर नाराजीचे सावट
By admin | Published: February 6, 2016 03:01 AM2016-02-06T03:01:39+5:302016-02-06T03:01:39+5:30
जि. प. च्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर बसविण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण ...
उपाध्यक्ष व सभापतींना व्यासपीठावर स्थान नाही
नागपूर : जि. प. च्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोर बसविण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण शनिवार ६ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. परंतु या सोहळ्याला पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचे ग्रहण लागले आहे.
लोकार्पण सोहळ्याचे आयोजन जि. प. ने केले आहे. त्यामुळे निमंत्रितांसह स्वाभाविकपणे जि. प. चे पदाधिकारी व्यासपीठावर असणे गरजेचे आहे. मात्र, अध्यक्ष सावरकर वगळता जि. प. चे उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती दीपक गेडाम, आशा गायकवाड व पुष्पा वाघाडे यांना मात्र व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही. स्थान देण्यात न आल्यामुळे एका बैठकीमध्ये सभापती व अधिकाऱ्यांमध्ये ‘तू-तू-मै-मै’ झाली. मात्र, प्रोटोकॉलचे कारण सांगून अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली. उपाध्यक्ष व सभापती असूनही त्यांना व्यासपीठावर स्थान नसल्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र तीव्र नाराजी उमटली आहे.
याचे पडसाद कदाचित या कार्यक्रमात उमटण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)