पेणमधील ३०० टन कचऱ्याची विल्हेवाट

By admin | Published: May 18, 2016 02:54 AM2016-05-18T02:54:15+5:302016-05-18T02:54:15+5:30

पावसाच्या अंदाजानुसार पेण पालिका प्रशासनाने नालेसफाई कार्यक्रम राबविण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

Disposal of 300 tonnes of garbage in the pen | पेणमधील ३०० टन कचऱ्याची विल्हेवाट

पेणमधील ३०० टन कचऱ्याची विल्हेवाट

Next


पेण : पावसाच्या अंदाजानुसार पेण पालिका प्रशासनाने नालेसफाई कार्यक्रम राबविण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. २८ एप्रिलपासून सुरू केलेली नालेसफाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. आतापर्यंत ८० टक्के नालसफ ाईची कामे पूर्ण झाली असून, तब्बल ३०० टन घनकचरा शहराबाहेरील डंपिंग ग्राउंडवर आंबेघर धामणी येथे नेण्यात आल्याचे आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकारी दयानंद गावंड यांनी नालेसफाई कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले.
याकामी दोन पालिका सुपरवायझर, आठ खासगी ठेकेदाराचे सुपरवायझर, सहा घंटागाड्यांवरील १८ कामगार, डंपरवाहकासहसह कामगार व रस्ते सफाईचे ४२ कामगार नालेसफाईचे २५ कामगारांकरवी मान्सूनपूर्व नालेसफाईचा धडक कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे.
पालिका प्रशासनाकडून प्लास्टिक पिशवी वापरावर बंदी असताना देखील बाजारातील फुटपाथ विक्रेते सर्रास प्लास्टिक पिशव्याचा वापर करीत आहेत, असे निदर्शनास आल्याने या फेरी विक्रेते व फुटपाथ विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाईचे संकेत देण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत याबाबतची धडक मोहीम हाती घेण्याची शक्यता अतिक्रमण विभागातर्फे करण्यात येईल.
शहर स्वच्छतेबाबत प्रशासन सतर्क असून २० दिवस झालेल्या नालेसफाईच्या कामाची पाहणी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी केलेली आहे. शहराचे वाढते नागरीकरण व ऐसपैस वाढणारी लोकवस्ती, गृहनिर्माण सोसायट्यांना पावसाळी हंगामात गटारे व नाले पाणी साचून तुंबणार नाही. याची दक्षता घेऊन नाले सफाईच्या कार्यक्रमावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शहराच्या मेन ड्रेनेजपैकी पेण न्यायालय ते रेल्वे स्थानक व झी गार्डन हॉटेल ते रेल्वे स्थानक पटरीपर्यंतचे पश्चिमेकडील ड्रेनेजचे गाळ उपसा शेष असून या ड्रेनेजच्या सफाई कामासाठी येत्या दोन दिवसांत युद्धपातळीवर नालेसफाईचे काम करण्यात येणार आहे. पेण शहरातील पाच मुख्य ड्रेनेजपैकी तीन ड्रेनेजची नालेसफाई पूर्ण झाली आहे. या नाल्यामधून तब्बल २२ ते २५ टन कचरा, गाळ व प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, अशा संमिश्र कचरा उचलून आंबेघर डंपिंग ग्राउंडवर करण्यात आली. सहा घंटागाड्या व सकाळ-दुपार अशा दोन सत्रांत डंपरद्वारे हा कचरा डंपिंग ग्राउंडवर नेण्यात येतो.

Web Title: Disposal of 300 tonnes of garbage in the pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.