कोल्हापूरमध्ये सेनेतील वाद पुन्हा उफाळला
By admin | Published: January 11, 2016 02:40 AM2016-01-11T02:40:44+5:302016-01-11T02:40:44+5:30
शिवसेनेतील अंतर्गत वाद रविवारी पुन्हा उफाळूनआला. शिवसेनेच्या नेत्यानीलम गोऱ्हे यांच्यासमोरच सेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी एका शिवसैनिकास शिवीगाळ करीत
कोल्हापूर : शिवसेनेतील अंतर्गत वाद रविवारी पुन्हा उफाळूनआला. शिवसेनेच्या नेत्यानीलम गोऱ्हे यांच्यासमोरच सेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी एका शिवसैनिकास शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आ. गोऱ्हे यांनी त्याची सुटका केली.
आ. गोऱ्हे दुपारी करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेल्या होत्या. त्यावेळी कोल्हापूर उत्तरचे आ. राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी साहेबांच्या विरोधात काम करतोस असे म्हणून रणजित सर्जेराव
आयरेकर यांना मारहाण केली. आयरेकर यांनी क्षीरसागर यांचे
स्वीय साहाय्यक राहुल बंदोडे, कार्यकर्ते सुनील जाधव व
उमेश रेळेकर यांच्याविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अंबाबाई मंदिरातील प्रकार हा वैयक्तिक वादातून
झालेला आहे. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही, असे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)