वाद मिटला! राजू शेट्टी यांच्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 11:18 AM2020-06-20T11:18:52+5:302020-06-20T11:40:56+5:30
राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत त्यापैकी १ जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता.
मुंबई : विधान परिषदेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी विधान परिषद निवडणुकीची ब्याद नकोच, अशी भूमिका घेतली होती. यावरून संघटनेमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे दिसत होते. कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंघ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला व हा वाद मिटविण्यात आला आहे.
राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत त्यापैकी १ जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या बैठकीमध्ये राजू शेट्टी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र, यानंतर स्वाभिमानीमध्ये धुसफूस सुरु झाली होती.
यावर राजू शेट्टी यांनी विधान परिषदेची ब्याद नको अशी भूमिका घेतली होती. काही पदाधिकारी माझ्या हेतूबद्दलच शंका घेत आहेत, हे अत्यंत क्लेषकारक आहे. गेल्या पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदाच असे घडलेले आहे. आजपर्यंत मी अनेक प्रसंगाना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात, पण घरच्या कटारीचे भाव जिव्हारी लागतात, अशी भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली होती.
अखेर राजू शेट्टी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील आणि सावकार मादनाईक याची नाराजी दूर करण्यात आली.
काय म्हणाले होते राजू शेट्टी
माझ्या नावाबाबत चर्चा होणार होती, म्हणून पदाधिका-यांना मोकळेपणाने चर्चा करता यावी या उद्देशाने मी जाणिवपुर्वक या बैठकीला गैरहजर राहिलो. तरीही सर्व पदाधिका-यांनी माझ्यानावाबाबत एकमत केले व तसा आघाडीच्या नेत्यांना निरोप पाठवण्यास सांगितले.तो निरोप घेऊन मी १६ जून रोजी आघाडीचे नेते शरद पवार साहेब यांना पक्षाचे सचिव ङॉ.महावीर अक्कोळे यांच्यासह भेटलो व होकार कळवला. आता काही पदाधिकारी माझ्या हेतूबद्दलच शंका घेत आहेत, हे अत्यंत क्लेषकारक आहे. गेल्या पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदाच असे घडलेले आहे. आजपर्यंत मी अनेक प्रसंगाना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात, पण घरच्या कटारीचे भाव जिव्हारी लागतात, अशी भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली होती.
अन्य महत्वाच्या बातम्या...
अंकिता, तूच सुशांतला वाचवू शकली असतीस, पण...; मित्राची भावनिक पोस्ट
मोदींनी भारताची जमीन चीनला देऊन टाकली; राहुल गांधी यांचा आरोप
CoronaVirus: होम आयसोलेशनवरून केंद्र सरकारने राज्यांना झापले; नियम बदलले...
भारताला मोठे यश! 26/11 चा मास्टरमाईंड तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला वेग; अमेरिकेत अटक
आजचे राशीभविष्य - 20 जून 2020; मिथुन राशीच्या लोकांना आजार, अपघाताची शक्यता