टिटवाळ्यात १५ दिवसांपासून पाण्याची नासाडी

By admin | Published: May 19, 2016 03:54 AM2016-05-19T03:54:51+5:302016-05-19T03:54:51+5:30

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्र मांक १० मध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे.

Disrupting the water for 15 days in the pit | टिटवाळ्यात १५ दिवसांपासून पाण्याची नासाडी

टिटवाळ्यात १५ दिवसांपासून पाण्याची नासाडी

Next


टिटवाळा : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रभाग क्र मांक १० मध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या नावाने बोटे मोडली. सध्या टिटवाळा रेल्वेस्थानक ते गणपती मंदिर या रस्त्याचे रु ंदीकरण सुरू आहे. यासाठी खोदकाम केले जात आहे.
कंत्राटदार रात्रीच्यावेळी काम करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा रस्ता खोदताना पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतात. यामुळे खोदकाम करताना जलवाहिनी फुटतात. केलेल्या कामाची पाहणी न करता सकाळी पाणी सोडले जात असल्याने मोठ्या प्रमाणावर गळती होऊन
लाखो लिटर पाणी वाया जाते. असा प्रकार गेली १५ दिवसांपासून सुरू आहे.
कंत्राटदाराच्या या मनमानी कारभाराकडे संबंधित ना विभागाचे ना पालिका प्रशासनाचे लक्ष. यामुळे नागरिकांना मात्र नाहक पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. आयुक्तांनी या प्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Disrupting the water for 15 days in the pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.