अनुशेषाच्या बैठकीत वाजला दुष्काळाचा डंका !
By admin | Published: August 25, 2015 02:31 AM2015-08-25T02:31:32+5:302015-08-25T02:31:32+5:30
मराठवाडा अनुशेषाच्या बैठकीत सोमवारी दुष्काळाचा डंका वाजला. बैठकीत आर्थिक अनुशेष दूर करण्याबाबत फक्त चर्चा झाली. त्यातून ठोस असा कोणताही निर्णय जाहीर न करता
औरंगाबाद : मराठवाडा अनुशेषाच्या बैठकीत सोमवारी दुष्काळाचा डंका वाजला. बैठकीत आर्थिक अनुशेष दूर करण्याबाबत फक्त चर्चा झाली. त्यातून ठोस असा कोणताही निर्णय जाहीर न करता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पिण्याचे पाणी आरक्षित करणे, रोजगार योजना लवचिक करणे, चारा छावण्यांच्या अध्यादेशात बदल करणे, सिंचन व रस्ते विकासासाठी आराखडा तयार करणे व केळकर समितीच्या अहवालाचा विचार करण्याची घोषणा केली.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला अर्थमंत्र्यांसह परिवहनमंत्री दिवाकर रावते, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट आदींसह ३० आमदार व खासदारांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे शिवसेनेचे कोणतेही लोकप्रतिनिधी बैठकीला हजर नव्हते.
नाराजीचा सूर आळवत शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, आ. नागेश आष्टीकर यांनी अनुशेष प्रकरणी बोलावलेल्या बैठकीतून अर्ध्या तासात काढता पाय घेतला. परभणी आणि नांदेडचे पालकमंत्री दिवाकर रावते हेसुद्धा अर्ध्या बैठकीतून निघून गेले. सर्व संस्था विदर्भात नेण्याचा सरकारचा घाट आहे. आयआयएमसारखी संस्था
तिकडे नेली, असा आरोप खैरे
यांनी केला. (प्रतिनिधी)