इच्छुकांच्या स्वप्नावर विरजण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2016 01:56 AM2016-10-19T01:56:09+5:302016-10-19T01:56:09+5:30

गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात उपनगरांमध्ये स्थलांतरित झाली.

Dissent on the dream of the fans | इच्छुकांच्या स्वप्नावर विरजण

इच्छुकांच्या स्वप्नावर विरजण

googlenewsNext

टीम लोकमत,

मुंबई- गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात उपनगरांमध्ये स्थलांतरित झाली. त्यामुळे पूर्वी सुमारे दोन लाख लोकवस्ती असलेल्या ए विभागात आता ६० हजारांच्या आसपास जनता उरली आहे. हीच अवस्था कुलाबा ते दादर या संपूर्ण शहर भागात आहे. परिणामी येथील सात प्रभाग फेररचनेत गायब झाले आहेत. याचा फटका ए विभागाला बसला आहे. थेट दोन प्रभागच फेररचनेत उडाल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकाची दांडी गूल झाली आहे. त्याचबरोबर इच्छुकांच्या स्वप्नावरही विरजण पडले आहे.
२००८ मध्ये अतिरेक्यांचे लक्ष्य ठरलेला हाच तो विभाग. बधवर पार्क, गेटवे आॅफ इंडिया, नौदलाची हद्द, ताजमहल, मंत्रालय अशी अनेक महत्त्वाची स्थळे, सरकारी आणि खासगी कार्यालये तसेच पुरातन व ऐतिहासिक स्थळे या विभागात असल्याने अतिसंवेदनशील असा हा विभाग आहे. सर्वेक्षणानुसार या विभागाच्या लोकसंख्येत तब्बल सव्वा लाखाने घट झाली आहे. त्यामुळे फेररचनेत येथील प्रभाग क्रमांक २२३ आणि २२४ बाजूच्या बी वॉर्डमध्ये सरकवण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेनेचे गणेश सानप आणि काँग्रेसचे जावेद जुनेजा यांचा पत्ता साफ झाला आहे.
फेररचनेत अनेकांच्या प्रभागाचे विभाजन झाले. मात्र या दोघांचा अख्खा प्रभागच गायब झाला असल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. ए विभागात एकूण पाच प्रभाग होते, ज्यामध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. शिवसेनेच्या वाट्याला असलेला एकमेव प्रभाग क्रमांक २२४ ही फेररचनेत उडाला आहे. आता या ठिकाणी फक्त २२५, २२६ आणि २२७ हे तीनच प्रभाग उरले आहेत. यामध्ये २२७ या प्रभागांतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले मकरंद नार्वेकर यांनी गेली पाच वर्षे शिवसेनेला समर्थन दिले होते. हा प्रभाग आरक्षणात खुला झाला आहे. त्यामुळे नार्वेकर यांचा दावा असणार आहे. मात्र अन्य प्रभागांमध्ये शिवसेनेला ताकदीचा उमेदवार द्यावा लागणार आहे.
>वॉर्ड क्रमांक - २२५
विजयी उमेदवार - सुषमा साळुंखे - ६०९३
पराभूत उमेदवार - थाळे विषया गोपीचंद - ५८५३
वॉर्ड क्रमांक २२६
विजयी उमेदवार -
अनिता यादव - ६५६८
पराभूत उमेदवार -
हिरा पावले - ६५४८
वॉर्ड क्र २२७
विजयी उमेदवार -
अ‍ॅड. मकरंद नार्वेकर २२०८
पराभूत उमेदवार -
अरविंद राणे - ९१५
>सीमा :
पूर्व डॉक भाग, बॅलॉर्ड इस्टेट, शहीद भगतसिंग मार्ग, पी. डिमेलो मार्ग, कर्नाक बंदर पूल, अजिंक्य चौक ते नेव्हल डॉक
पश्चिम : नेताजी सुभाष मार्ग (मरिन ड्राइव्ह समुद्र) नेव्ही नगर ते फोरस मार्ग जंक्शन
उत्तर : आनंदीलाल पोद्दार मार्ग, लोकमान्य टिळक मार्ग आणि एफ रोड, कर्नाक बंदर पूल, अजिंक्य चौक, पी. डिमेलो मार्ग जंक्शन
>दक्षिण : कुलाबा (मिलीटरी क्षेत्र)
लोकसंख्या पूर्वी दोन लाख १० हजार आता ६०,६९५
रेल्वे स्थानक - दोन, बेस्ट आगार - १ कुलाबा बॅक बे
पोलीस स्थानक १ आझाद मैदान
महानगरपालिका रुग्णालये १, महानगरपालिका प्रसूतिगृहे नाही
महानगरपालिका दवाखाने ५, आरोग्य केंद्रे दोन, खासगी रुग्णालये आणि शुश्रूषागृहे १७, स्मशाने नाहीत
रस्ते : मोठे: ३९, लहान १३५
२००८ मध्ये झालेला अतिरेकी हल्ला याच विभागात झाला होता. तसेच या विभागात बधवर पार्क, गेटवे आॅफ इंडिया, नौदलाची हद्द, ताजमहल, मंत्रालय अशी अनेक महत्त्वाची स्थळे, सरकारी आणि खासगी कार्यालये तसेच पुरातन व ऐतिहासिक स्थळे असल्याने अतिसंवेदनशील असा हा विभाग आहे.
>प्रभाग क्रमांक - २२५
एकूण लोकसंख्या - ६१,३४१
अनुसूचित जाती - ६७५३
अनुसूचित जमाती - १३२१
प्रभागाची व्याप्ती - फोर्ट - ताजमहाल हॉटेल - गेट वे आॅफ इंडिया
>प्रभाग क्रमांक - २२६
एकूण लोकसंख्या - ६२,९७८
अनुसूचित जाती - ४२४३
अनुसूचित जमाती - १६४४
प्रभागाची व्याप्ती - नरिमन पॉइंट - मच्छीमार नगर - गणेशमूर्ती नगर
>प्रभाग क्रमांक - २२७
एकूण लोकसंख्या - ६०,६९५
अनुसूचित जाती - २६५६
अनुसूचित जमाती - २२८
प्रभागाची व्याप्ती - गीता नगर
- चर्च - नेव्ही नगर

Web Title: Dissent on the dream of the fans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.