गणेशमूर्तींच्या वितरणात मुसळधार पावसाचे विघ्न
By admin | Published: August 3, 2016 02:48 AM2016-08-03T02:48:16+5:302016-08-03T02:48:16+5:30
बाप्पाच्या आगमनाला अवघा महिनाभराचा कालावधी शेष राहिला आहे.
दत्ता म्हात्रे,
पेण- बाप्पाच्या आगमनाला अवघा महिनाभराचा कालावधी शेष राहिला आहे. पेणच्या कलाग्राम नगरी हमरापूर - जोहे - कळवे व पेण शहरातील गणेशमूर्तींचे देश-विदेशात वितरण सुरू झाले आहे. मात्र अतिवृष्टीमुळे बाप्पाच्या वितरणात विघ्न येत आहे. शनिवारपासून सुरु झालेल्या संततधारेचा जोर अजूनही कायम आहे. याचा फटका गणेशमूर्तिकारांना बसत आहे. खड्डेमय रस्ते, पावसाच्या संततधारेने टेम्पो व ट्रक्समध्ये मूर्ती भरताना अडथळा येत असल्याने नोंदणी केलेल्या आॅर्डर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात व शहरात नेताना विलंब होत आहे.
यंदा गणेशोत्सव ५ सप्टेंबरपासून सुरु होत असल्याने गोवा, कर्नाटक, गुजरात या राज्यातील गणेशमूर्तींच्या आॅडर्स जूनच्या मध्यावधीतच पूर्ण झाल्याचे गणेशमूर्तिकारांचे म्हणणे आहे. मात्र महाराष्ट्राचा आराध्य असलेला बाप्पा महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह त्या - त्या जिल्ह्यातील गावगाड्यातली मागणी ही साधारणपणे जुलै व आॅगस्ट महिन्यात पूर्ण केली जाते. सर्वात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो तो कोकण किनारपट्टीसह, मुंबई, उपनगरे, पुणे व नाशिक शहरात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एजंटांमार्फत गणेशमूर्तींची विक्री होण्यासाठी पेणच्या मूर्तीचे वितरण केले जाते. साधारणपणे पेण शहरातून १५ ते २० टेम्पो तर ग्रामीण हमरापूर - जोहे, (तांबडशेत), कळवे या कलाग्राम नगरीतून २० ते २५ गाड्या गणेशमूर्ती भरुन नेण्यात येतात. गेले आठवडाभर पावसाने धुमाकूळ घातला असून रंगविलेल्या गणेशमूर्तींचे पॅकिंग करताना पावसामुळे विघ्न येत आहे.
>15 ते २० टेम्पो तर ग्रामीण हमरापूर - जोहे, (तांबडशेत), कळवे या कलाग्राम नगरीतून २० ते २५ गाड्या गणेशमूर्ती भरुन नेण्यात येतात. गेले आठवडाभर पावसाने धुमाकूळ घातला असून रंगविलेल्या गणेशमूर्तींचे पॅकअप करताना पावसामुळे विघ्न येत आहे.