१३ हजार हेक्टरवरील उभ्या पिकावर नांगर, बीड जिल्ह्यातील १५ गावांतील व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 06:57 AM2019-08-19T06:57:18+5:302019-08-19T06:57:32+5:30

प्रशासनाने तात्काळ खरीप हंगामातील पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 Distress over 13 thousand hectares of vertical crop in 15 villages in Beed district | १३ हजार हेक्टरवरील उभ्या पिकावर नांगर, बीड जिल्ह्यातील १५ गावांतील व्यथा

१३ हजार हेक्टरवरील उभ्या पिकावर नांगर, बीड जिल्ह्यातील १५ गावांतील व्यथा

googlenewsNext

- राम लंगे

वडवणी (जि.बीड): शेतकऱ्यांनी उसनवार करुन, खाजगी सावकाराचे कर्ज काढून बी-बियाणे, खते घेऊन जूनच्या मध्यंतरी थोड्याफार प्रमाणात पडलेल्या पावसावर पेरणी केली होती. त्यानंतर दोन महिने होऊनही पावसाचा थेंबही न पडल्याने पेरलेले बियाणे उगवून संपूर्णपणे जळून गेले आहे. त्यामुळे तालुक्यातील १५ गावांमध्ये शेतकरी संपूर्ण पिकावर नांगर फिरवित असल्याचे विदारक चित्र सध्या दिसत आहे.
प्रशासनाने तात्काळ खरीप हंगामातील पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तालुक्यातील एकूण पेरणी योग्य ३२ हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी यावर्षी कापूस १९ हजार ७८ हेक्टर, तूर १ हजार ८३ हेक्टर, सोयाबीन ४ हजार २०० नोंद झाली. १८ ते २१ आॅगस्ट दरम्यान कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोमवार, मंगळवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२, २७ अंशाच्या आसपास राहील.

परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता
तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली असून, खरीप हंगामात १५ गावांतील पिकांचे जवळपास ८० टक्के नुकसान झाले असून याबाबत कृषी विभागाने पीक परिस्थिती अहवाल तहसीलदार यांना कळविला आहे. चार दिवसांत पाऊस न पडल्यास तालुक्यातील इतर गावांतील परिस्थिती ही गंभीर बनण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी शरद शिनगारे यांनी दिली.

Web Title:  Distress over 13 thousand hectares of vertical crop in 15 villages in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.